शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आता व्हॉट्स अ‍ॅपद्वारेही पाठविता येणार वीज पुरवठा खंडित करण्याची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 12:27 IST

अकोला : थकीत वीज बिलापोटी ग्राहकास वीज पुरवठा खंडित करण्यासाठी ‘एसएमएस’, व्हॉट्स अ‍ॅप अथवा ई-मेल या डिजिटल माध्यमांद्वारे कलम ५६ अंतर्गत पाठविलेली नोटीस आता वैध मानली जाणार आहे.

ठळक मुद्देडिजिटल माध्यमांचा वापर करण्याची मुभा वीज नियामक आयोगाने १२ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या एका परिपत्रकाद्वारे महावितरणला दिली.एखाद्या ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करावयाचा असल्यास तशी नोटीस मात्र रजिस्टर टपालद्वारेच पाठवावी लागते. व्हॉट्स अ‍ॅप, एसएमएस किंवा ई-मेलवर वीज पुरवठा खंडित करण्याबाबतची नोटीस पाठविणे पुरेसे ठरणार आहे.

अकोला : थकीत वीज बिलापोटी ग्राहकास वीज पुरवठा खंडित करण्यासाठी ‘एसएमएस’, व्हॉट्स अ‍ॅप अथवा ई-मेल या डिजिटल माध्यमांद्वारे कलम ५६ अंतर्गत पाठविलेली नोटीस आता वैध मानली जाणार आहे. नोटीस पाठविण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्याची मुभा वीज नियामक आयोगाने १२ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या एका परिपत्रकाद्वारे महावितरणला दिली असून, यामुळे महावितरणच्या प्रशासकीय खर्चात बचत होणार आहे.पेपरलेसच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या महावितरणकडून वीज बिलाची माहिती, वीज पुरवठा कधी बंद राहणार, यासह इतर माहिती वीज ग्राहकांना ‘एसएमएस’, व्हॉट्स अ‍ॅप व ई-मेलच्या माध्यमातून पाठविण्यात येते. एखाद्या ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करावयाचा असल्यास तशी नोटीस मात्र रजिस्टर टपालद्वारेच पाठवावी लागते. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि खर्चिक असल्यामुळे त्यामध्ये बदल करून डिजिटल माध्यमांचा वापर करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी महावितरणकडून करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत वीज नियामक आयोगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या ११ जून २०१८ रोजीच्या एका निवाड्याचा संदर्भ देत महावितरणला डिजिटल माध्यमांद्वारे नोटीस पाठविण्याची परवानगी दिली आहे. ही मुभा मिळाल्यामुळे महावितरणला आता संबंधित ग्राहकांना व्हॉट्स अ‍ॅप, एसएमएस किंवा ई-मेलवर वीज पुरवठा खंडित करण्याबाबतची नोटीस पाठविणे पुरेसे ठरणार आहे.नोटीस पाठविण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर केल्यास महावितरणच्या प्रशासकीय खर्चात बचत होऊ शकेल, असे वीज नियामक आयोगाने म्हटले आहे.जनजागृती गरजेचीडिजिटल माध्यमांच्या वापरास मुभा देतानाच आयोगाने यासंदर्भात वीज ग्राहकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे असल्यावर भर दिला आहे. संबंधित ग्राहकांना कोणत्या पद्धतीने नोटीस पाठविल्या जाऊ शकतात, याची माहिती करून देणे गरजेचे आहे. यासाठी विविध उपाययोजना करणे गरजेचे असल्याचेही आयोगाने म्हटले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरण