शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेशीम उद्योगांसाठी आता मोबाइल अँप

By admin | Updated: July 31, 2015 22:49 IST

तंत्रज्ञानाची जोड दिल्यास योजनेचा शेतक-यांना फायदा.

नीलेश शहाकार/बुलडाणा: राज्यातील रेशीम उद्योग व विकास कार्यक्रमांना चालना व गती देण्यासाठी शासनातर्फे मोबाईल अँप्लीकेशन विकसीत करण्यात येणार आहे. उद्योग व विकास कार्यक्रमांशी जुळलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी हे अँप्लीकेशन वापरावे, यासाठी शासनाकडून प्रोत्साहीत केले जाणार असून, त्याचा फायदा रेशीम उद्योगातील शेतकर्‍यांनाही होणार आहे. पावसाची अनियमिता आणि त्यामुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती पाहून, कर्जाखाली दबलेले अनेक शेतकरी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग स्विकारत आहे. या दुष्टचक्रातून शेतकर्‍यांना कायमस्वरुपी मुक्ती मिळवी, म्हणून शेतकर्‍यांनी रेशीम उद्योगाची कास धरावी, यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. यातूनच रेशीम उद्योगांना नवीन तंत्रज्ञाची जोड देण्यासाठी मोबाईल अँप्लीकेशन तयार करण्याचा निर्णय ३१ जुलै रोजी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने घेतला. रेशीम उद्योगांचे बळकटीकरण करण्यासाठी शासनाकडून विविध प्रयत्न सुरु आहेत. रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने ११ कोटी २४ लाख रुपयांच्या निधी जानेवारी २0१५ मध्ये मंजूरी केला होता. यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला होता. *ऑनलाईन छायाचित्र घेवून सेवा व दुरुस्ती सुचविणार रेशीम शेतीचे महत्व लक्षात घेता राज्यातील रेशीम उद्योग प्रकल्पातील तुती बाग, संगोपनगृहाचे योजना अधिकारी, कर्मचारी आिण रेशीम उद्योग शेतकर्‍यांना या मोबाईल अँप्लीकेशनवर छायचित्र अपलोड करतील. या छायाचित्रांच्या आधारे रेशीम प्रकल्पातील त्रुटी सुचवून ऑनलाईन दुरुस्ती व सेवा शासनाकडून शेतकर्‍यांना दिली जाईल. यासाठी महाराष्ट्र रिमोट सेंन्सिंग अँप्लीकेशन सेंटर (एमआरएसएसी) या संस्थेमार्फत हे मोबाईल अँप्लीकेशन विकसीत करण्यात येणार आहे. यासाठी शासनाने १६.६६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.