शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिकाधारकांना आता ओळख पटवून धान्य वाटप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 02:06 IST

अकोला : आधार संलग्नित सार्वजनिक वितरण व्यवस्था (एईपीडीएस) प्रणालीचा वापर करून शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्याची प्रक्रिया राज्यातील सर्व जिल्हय़ात सुरू करण्यात येणार आहे; मात्र ज्या शिधापत्रिकाधारकांकडे ‘आधारकार्ड’ नाही, अशा शिधापत्रिकाधारकांना ओळख पटवून धान्य वितरित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे १ मार्चपासून अंमलबजावणी ‘एईपीडीएस’ प्रणालीचा होणार वापर

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आधार संलग्नित सार्वजनिक वितरण व्यवस्था (एईपीडीएस) प्रणालीचा वापर करून शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्याची प्रक्रिया राज्यातील सर्व जिल्हय़ात सुरू करण्यात येणार आहे; मात्र ज्या शिधापत्रिकाधारकांकडे ‘आधारकार्ड’ नाही, अशा शिधापत्रिकाधारकांना ओळख पटवून धान्य वितरित करण्यात येणार आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत राज्यातील रास्त भाव दुकानांमध्ये ‘ई-पॉस’ मशीन बसविण्यात आल्या असून, त्याद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने ओळख पटवून पात्र शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण करण्यात येत आहे. त्यामध्ये सध्या राज्यातील नागपूर, सोलापूर, वाशिम, जालना, नांदेड, कोल्हापूर, हिंगोली, वर्धा व भंडारा  या जिल्हय़ातील रास्त भाव दुकानांत आधार संलग्नित सार्वजनिक वितरण व्यवस्था (एईपीडीएस) या अद्ययावत प्रणालीचा वापर करून धान्य वितरित करण्यात येत आहे. या पृष्ठभूमीवर अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या गत २ फेब्रुवारी रोजीच्या पत्रानुसार राज्यातील सर्व जिल्हय़ात १ मार्चपासून ‘एईपीडीएस’ प्रणालीचा वापर करून शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्यात येणार आहे. त्यामध्ये शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्नित करण्यात आलेल्या शिधपत्रिकाधारकांना ‘ई-पॉस’ मशीनद्वारे धान्य वितरित करण्यात येणार आहे. तसेच ज्या शिधापत्रिकाधारकांचे आधार क्रमांक संलग्नित करण्यात आले नाही, अशा शिधापत्रिकाधारकांचे आधार क्रमांक संलग्नित (लिंक) करण्यात येणार आहेत; मात्र ज्या शिधापत्रिकाधारकांकडे आधारकार्ड किंवा आधार क्रमांक नाही, अशा शिधापत्रिकाधारकांना त्यांची ओळख पटवून धान्य वाटप करण्यात येणार आहे. आधार क्रमांक ‘लिंक’ असलेल्या गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठय़ांमार्फत आधारकार्ड नसलेल्या शिधापत्रिकाधारकांची ओळख पटविण्यात येणार असून,ओळख पटवून संबंधित शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्यात येणार आहे.

‘डीएसओं’नी मागितली सरपंच, तलाठय़ांची माहिती!आधारकार्ड नसलेल्या शिधापत्रिकाधारकांना ओळख पटवून रास्त भाव दुकानांमधून धान्य वितरित करण्यात येणार आहे. गाव पातळीवर सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व ग्रामसेवकांमार्फत संबंधित शिधापत्रिकाधारकांची ओळख पटविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने अकोला जिल्हय़ातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी त्यांचे आधार क्रमांक व मोबाइल क्रमांक इत्यादी माहिती जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडून (डीएसओ) मागविण्यात आली आहे. अशीच माहिती इतर जिल्हय़ातही ‘डीएसओं’कडून मागविण्यात आली आहे.

‘एईपीडीएस’ प्रणालीचा वापर करून १ मार्चपासून शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्यात येणार आहे. त्यामध्ये ज्या शिधापत्रिकांकडे आधार क्रमांक नाही, अशा शिधापत्रिकाधारकांची ओळख पटवून धान्य वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हय़ातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांचे आधार क्रमांक व मोबाइल क्रमांक इत्यादी माहिती मागविण्यात आली आहे.- संतोष शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी

टॅग्स :Akola cityअकोला शहर