शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांसाठी आता मूल्यांकन अहवाल!

By atul.jaiswal | Updated: April 5, 2018 15:05 IST

अकोला: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी स्वरूपात कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नोकरीचे भवितव्य त्यांच्या ‘परफॉर्मन्स’वर ठरविण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.

ठळक मुद्दे कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी ‘एचआर परफॉर्मन्स इंडिकेटर्स’ तयार करण्यात आले आहे.मूल्यांकन अहवालानुसार पगारवाढ, नोकरीवर कायम ठेवणे किंवा कमी करणे या बाबी निश्चित करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाने येत्या ११ एप्रिलपासून बेमुदत काम बंदची हाक दिली आहे.

- अतुल जयस्वाल

अकोला: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी स्वरूपात कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नोकरीचे भवितव्य त्यांच्या ‘परफॉर्मन्स’वर ठरविण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी ‘एचआर परफॉर्मन्स इंडिकेटर्स’ तयार करण्यात आले असून, कामगिरीनुसार त्यांना पगारवाढ द्यायची, नोकरीवर कायम ठेवायचे की सेवा थांबवावी, हे ठरणार आहे. राष्ट्रीय शहर आरोग्य अभियानाचे अतिरिक्त संचालक सतीश पवार यांनी २ एप्रिल रोजी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स्ािंगद्वारे या सूचना दिल्याने कंत्राटी कर्मचाºयांची घालमेल वाढली असून, या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवित राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाने येत्या ११ एप्रिलपासून बेमुदत काम बंदची हाक दिली आहे.आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने तुटपुंजा मानधनावर कार्यरत असलेले ‘एनएचएम’ कर्मचारी आरोग्यसेवेत कायम करून घेण्याच्या मागणीसाठी गत अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. आरोग्य संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या या कर्मचाºयांना दरवर्षी अकरा महिन्यांची पुनर्नियुक्ती एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन देण्यात येते. समान काम-समान वेतन व कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी हे कर्मचारी आंदोलन करीत आहेत. त्यांना सेवेत सामावून घेण्याची शक्यता पडताळण्यासाठी आरोग्य विभागाने अभ्यास समिती गठित केली असतानाच, आयुक्त, आरोग्यसेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या कार्यालयाकडून २ एप्रिल रोजी राज्यभरातील जिल्हा कार्यालयांना कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मूल्यांकन अहवालाची एक्सलशिट पाठविण्यात आली आहे. यामध्ये कामाच्या स्वरूपानुसार गुणांकन पद्धती असून, त्यावर आधारित मूल्यांकन अहवाल तयार होणार आहे. मूल्यांकन अहवालानुसार कंत्राटी कर्मचाºयांना पगारवाढ, नोकरीवर कायम ठेवणे किंवा कमी करणे या बाबी निश्चित करण्यात येणार आहेत. आरोग्य विभागाच्या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाने येत्या ११ एप्रिलपासून बेमुदत काम बंदचा इशारा दिला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना यापुढे सहा महिन्यांची पुनर्नियुक्ती देण्याच्या सूचनाही अतिरिक्त संचालकांनी दिल्याचे संघटनेचे म्हणणे असून, त्यालाही संघटनेचा विरोध असल्याचे संघटनेचे सचिव विजय सोनोने यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.काय आहेत मानांकने?कामगिरी                                                           परिणामअतिउत्तम (९५ टक्के किंवा जास्त)                    १५ टक्के पगारवाढउत्तम (८०-९५ टक्के)                                         १० टक्के पगारवाढखूप चांगली (६५-७९ टक्के)                                  ५ टक्के पगारवाढसमाधानकारक (४० ते ६४ टक्के)                        नोकरी कायमअसमाधानकारक (४० टक्क्यांपेक्षा कमी)            सेवा समाप्तसंघटनेचा आक्षेपकंत्राटी कर्मचाऱ्यांकडे ज्या कामाची जबाबदारी नाही किंवा जे काम त्यांच्या जॉबचार्टमध्ये नाही, त्याकरिता त्यांना जबाबदार धरून त्यांचे मूल्यांकन कमी करण्याचा प्रयत्न या एक्सलशिटमध्ये असल्याचा आरोप संघटनेचा आहे. आर्थिक बाबींचे अधिकार कंत्राटी कर्मचाºयांना नसतानाही, त्यासाठी त्यांना जबाबदार ठरविणे अत्यंत चुकीचे व अन्यायकारक असल्याचे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाने आयुक्त, आरोग्यसेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.कंत्राटी कर्मचाऱ्यांना जॉबचार्टनुसारच एक्सलशिट देण्यात आली आहे. कामगिरीनुसार त्यांचे मूल्यांकन करण्यात येऊन, त्यावर त्यांची पगारवाढ किंवा इतर बाबी अवलंबून राहणार आहेत.- डॉ. नितीन अंबाडेकर, आरोग्य उपसंचालक, आरोग्यसेवा, अकोला मंडळ.

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना