शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आता आले ‘ऊर्जा-कार्यक्षम’ पंखे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विजेची बचत करणार्‍या ‘एलईडी’ बल्ब वितरण योजनेला लोकांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर  एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने आता ऊर्जा-कार्यक्षम पंखे बाजारात आणले आहेत. मुंबईतून या योजनेला सुरुवात झाल्यानंतर ‘ईईएसएल’ने अकोल्यात प्रायोगिक तत्त्वावर या पंख्यांचे वितरण बुधवारपासून सुरू केले. ४५ वॉट क्षमतेचा असलेला हा ...

ठळक मुद्दे‘ईईएसएल’चा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर वितरण सुरू४५ वॉट क्षमतेचा हा पंखा ‘फाईव्ह स्टार’ रेटिंगचा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विजेची बचत करणार्‍या ‘एलईडी’ बल्ब वितरण योजनेला लोकांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर  एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने आता ऊर्जा-कार्यक्षम पंखे बाजारात आणले आहेत. मुंबईतून या योजनेला सुरुवात झाल्यानंतर ‘ईईएसएल’ने अकोल्यात प्रायोगिक तत्त्वावर या पंख्यांचे वितरण बुधवारपासून सुरू केले. ४५ वॉट क्षमतेचा असलेला हा पंखा ‘फाईव्ह स्टार’ रेटिंगचा असून, तो केवळ १२00 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.ईईएसएल या कंपनीने महाराष्ट्रात जुलै २0१५ मध्ये एलईडी दिवे वितरित करण्याची योजना महावितरणच्या सहाय्याने सुरू केली होती. या ‘उजाला’ योजनेंतर्गत सुरुवातीला सात वॅट, तर नंतर नऊ वॅटचे एलईडी बल्ब आणि त्यानंतर २0 वॅटचे एलईडी ट्यूबलाइट बाजारात आणले.  उज्रेची बचत करणारे दिवे वितरित करण्याची योजना यशस्वी झाल्यानंतर कंपनीने ऊर्जा-कार्यक्षम पंखे आणण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे ठेवला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर, मुंबई येथे हे पंखे वितरित करण्याच्या योजनेला गत महिन्यात सुरुवात झाली. आता प्रायोगिक तत्त्वावर अकोल्यातही ही योजना सुरू करण्यात आली आहे. महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवनसमोर थाटलेल्या एलईडी बल्ब विक्रीच्या स्टॉलमध्ये हे ऊर्जा-कार्यक्षम पंखे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. 

स्वस्त आणि उज्रेची बचत करणारा पंखा सामान्य पंखे ९0 ते १00 वॅटचे असतात, त्यामुळे त्यांना जास्त वीज लागते; परंतु ईईएसलचा हा ४५ वॅटचा असल्यामुळे विजेची बचत होते. ईईएसलने आणलेला ऊर्जा कार्यक्षम पंखा हा फाइव्ह स्टार रेटिंगचा आहे. साधारणपणे अशा पंख्यांची बाजारातील किंमत १८00 रुपयांपर्यंत असते; परंतु ईईएसलच्या स्टॉलवर हे पंखे १२00 रुपयांमध्ये विकले जात आहेत. नागरिकांनी ईईएसलच्या स्टॉलवरील अधिकृत पंखेच घ्यावे, असे  ईईएसलचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक कोकाटे यांनी सांगितले.