शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

आता भाजपाचे लक्ष्य विधानसभेसह मिनी मंत्रालय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 12:36 IST

भाजपाने आपला जनाधार आणखी मजबूत केला असून, आता अकोल्यातील सहाही विधानसभा मतदारसंघासह जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचे ‘लक्ष्य’ समोर ठेवले आहे.

ठळक मुद्देअकोल्यातील पाच विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपाने चार मतदारसंघांत विजय मिळविला आहे.सर्वच विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात भाजपाने घेतलेली मते ही काँग्रेस व वंचितसाठी आव्हानात्मक आहे. लोकसभा निकालाच्या पृष्ठभूमीवर विचार केला तर भाजपाचे पारडे जड दिसते.

- राजेश शेगोकार

अकोला: मोदी लाट ओसरली अशी हाकाटी पिटत विरोधकांनी प्रचाराचा धुराळा उडविला; मात्र २०१४ पेक्षाही अधिक २०१९ मध्ये मोदी लाटेचा तडाखा बसला. लोकसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्य मिळवित भाजपाने आपला जनाधार आणखी मजबूत केला असून, आता अकोल्यातील सहाही विधानसभा मतदारसंघासह जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचे ‘लक्ष्य’ समोर ठेवले आहे.२०१४ ची लोकसभा निवडणूक ही देशाच्या राजकारणाचे चित्र आमूलाग्र बदलविणारी ठरली. मोदी लाटेचा करिष्मा उभ्या देशाने अनुभवला. यामध्ये अकोला लोकसभा मतदारसंघानेही या लाटेवर स्वार होत ‘कमळ’ फुलविले. लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपाचा वरचष्मा राहिला असला, तरी रिसोड व बाळापूर या दोन मतदारसंघांवर भाजपाला विजय मिळविता आला नाही तसेच अकोला पूर्व या मतदारसंघात अवघ्या २ हजार ४४० मतांनी भाजपा जिंकली. त्यामुळे सहापैकी तीन मतदारसंघांत भाजपासमोर आव्हान उभे राहू शकते, असे आकडे सांगतात; मात्र आकड्यांचा हा खेळ परवाच्या लोकसभा निवडणूक निकालांनी ‘निकालात’ काढला आहे. येऊ घातलेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी युती अन् कायम राहिली व जागा वाटपाचा गुंता सुरळीत सुटला तर भाजपाचे आव्हान मोडून काढण्याचे मोठे आव्हान काँग्रेस आघाडीसमोर राहणार आहे. सर्वच विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात भाजपाने घेतलेली मते ही काँग्रेस व वंचितसाठी आव्हानात्मक आहे. युती, आघाडीचा गुंता सुरळीत सुटला तर या दोन मित्रांच्या आघाडी व वंचित बहुजन आघाडी असा तिरंगी सामना प्रत्येक मतदारसंघात ठरलेला आहे. लोकसभा निकालाच्या पृष्ठभूमीवर विचार केला तर भाजपाचे पारडे जड दिसते.युतीचा गुंता अन् आघाडीचे त्रांगडे!२०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी युती अन् आघाडी कायम राहिली तर सर्वात आधी जागा वाटपाचा गुंता निर्माण होऊ शकतो. अकोल्यातील पाच विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपाने चार मतदारसंघांत विजय मिळविला आहे. त्यामुळे सेनेला एक मतदारसंघ भाजपाला देणे सहज शक्य आहे; मात्र सेनेचा बाळापूर व अकोट अशा दोन मतदारसंघांवर दावा असल्याने भाजपासमोर उघड बंडखोरीचे आव्हान उभे राहू शकते. आघाडीमध्ये काँग्रेसला तीन व राष्टÑवादीला दोन असे मतदारसंघ दिले असले तरी आता राष्टÑवादीला अकोला पश्चिम किंवा बाळापूर असा एक मतदारसंघ हवा असल्याने आघाडीतही तेच चित्र राहील. भाजपाचे अकोल्यावर वर्चस्व असले तरी युतीमध्ये सेनेला तसेच घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामच्याही अपेक्षांचे ओझे भाजपावर राहणार आहे. त्यामुळे भाजपाच्या उमेदवारांसमोरही बंडखोरीचे संकट कायमच आहे.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliticsराजकारणBJPभाजपाShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक