शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘एक अपार्टमेंट-एक नळ जोडणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 12:16 IST

अपार्टमेंटमधील सर्वच रहिवाशांना स्वतंत्र नळ जोडणी न देता यापुढे ‘एक अपार्टमेंट-एक नळ जोडणी’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

अकोला: विद्युत मोटरीद्वारे पाण्याचा अनिर्बंध वापर करणाऱ्या रहिवासी अपार्टमेंटमधील सुज्ञ अकोलेकरांवर महापालिका प्रशासनाने कायद्याचा बडगा उगारला आहे. अपार्टमेंटमधील सर्वच रहिवाशांना स्वतंत्र नळ जोडणी न देता यापुढे ‘एक अपार्टमेंट-एक नळ जोडणी’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आजरोजी स्वतंत्र नळ जोडणी असल्यास ती रद्द करण्यात आल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.मनपाच्यावतीने शहरातील विविध भागात जलवाहिनीचे जाळे टाकण्याचे काम सुरू आहे. काही परिसरात जलवाहिनी टाकून नागरिकांना नळ कनेक्शन दिल्यानंतरही त्यांच्या घरापर्यंत पाणीपुरवठा होत नसल्याच्या असंख्य तक्रारी समोर येत आहेत. जलवाहिनीवरील शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी मनपाकडून किमान तीन तास पाणीपुरवठा सुरू ठेवला जातो. परिणामी त्या-त्या परिसरातील नागरिकांकडून इतर गरजू नागरिकांचा कवडीचाही विचार न करता वाहने धुणे, अंगणात पाणी शिंपडण्यासाठी पाण्याचा अपव्यय केला जातो. रहिवासी अपार्टमेंटमध्ये स्वतंत्र नळ जोडण्या असल्यामुळे विद्युत मोटरीद्वारे पाण्याचा उपसा केला जातो. त्यामुळे त्याच भागातील इतर नागरिकांना पाणीपुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. या सर्व बाबी लक्षात घेता रहिवासी अपार्टमेंटमधील रहिवाशांना यापुढे ‘एक अपार्टमेंट-एक नळ जोडणी’ देण्याचा निर्णय जलप्रदाय विभागाने घेतला आहे.टाक्यातून करा उपसा!रहिवासी अपार्टमेंटमधील मालमत्ताधारकांनी स्वतंत्र नळ जोडणी रद्द करावी लागेल. एकाच नळ जोडणीद्वारे टाक्यात पाणी जमा केल्यानंतर त्याचा विद्युत मोटरीने सामुहिक उपसा करता येणार आहे. स्वतंत्र नळ जोडणी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. मालमत्ताधारकांची संख्या लक्षात घेता किती व्यासाच्या नळ कनेक्शनची गरज आहे, यासंदर्भात मनपाच्या निर्देशानुसार नळ जोडणी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.शहरातील सर्व अपार्टमेंटमधील मालमत्ताधारकांनी पुढील आठ दिवसात सामूहिक नळ कनेक्शन घेण्याबाबत जलप्रदाय विभागामध्ये संपर्क साधावा. प्राप्त अर्जानुसार नळ जोडणी दिली जाईल. त्यानंतर शोध मोहिमेदरम्यान कारवाईचा पर्याय खुला आहे.- सुरेश हुंगे कार्यकारी अभियंता जलप्रदाय विभाग, मनपा

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका