शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

कुख्यात गुंड ‘लाल्या’ला ‘एमपीडीए’चा दणका; कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यावर हात उचलणे भाेवले

By आशीष गावंडे | Updated: April 18, 2024 21:33 IST

त्याच्याविराेधात यापुर्वीही विविध कलमान्वये प्रतिबंधक तसेच ‘एमपीडीए’ अन्वये कारवाइ आली होती. परंतु ताे पाेलिसांच्या कारवाइला जुमानत नव्हता.

अकोला: जिल्हा कारागृहात एक वर्षांसाठी स्थानबध्द केलेल्या एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला भेटण्यासाठी गेलेला कुख्यात गुंड स्वप्नील उर्फ लाल्या अशाेक पालकर (३४) रा. पंचशिल नगर वाशिम बायपास याने कारागृहातील तुरुंग अधिक्षकावर हात उचलल्याची गंभीर दखल घेत जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी ‘लाल्या’ला ‘एमपीडीए’चा दणका दिला आहे. गुरुवारी ‘लाल्या’ला एक वर्षांसाठी वाशिम येथील कारागृहात खडी फाेडण्यासाठी पाठविण्याची कारवाइ करण्यात आली. या कारवाइमुळे स्वत:ला दादा,भाइ म्हणविणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. 

वाशिम बायपास परिसरातील पंचशिल नगरमध्ये राहणाऱ्या कुख्यात गुंड स्वप्नील उर्फ लाल्या अशोक पालकर याच्यावर यापुर्वी खूनाचा प्रयत्न, बलात्कार, जबरी चोरी करणे, गंभीर दुखापत करणे, एखा‌द्या व्यक्तीला मृत्युची भिती दाखवणे, धमक्या देऊन घरावर अतिक्रमण करणे, घातक हत्यार किंवा साधनांचा वापर करणे, प्राण घातक हत्यारानिशी सज्ज होवुन दंगा करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविराेधात यापुर्वीही विविध कलमान्वये प्रतिबंधक तसेच ‘एमपीडीए’ अन्वये कारवाइ आली होती. परंतु ताे पाेलिसांच्या कारवाइला जुमानत नव्हता.

अखेर पाेलिस अधीक्षक सिंह यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, ‘पीएसआय’ आशिष शिंदे, ज्ञानेश्वर सैरिसे, उदय ईश्वरीप्रसाद शुक्ला, सिटी कोतवालीचे ठाणेदार सुनिल वायदंडे, ‘पीएसआय’माजीद पठाण,अंमलदार दिनेश शिरसाठ यांनी कुख्यात गुंड स्वप्नील पालकरची कुंडली जमा करीत ‘एमपीडीए’चा प्रस्ताव तयार करुन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्याकडे सादर केला. या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूरी दिली. 

जिल्हा पाेलिस अधिक्षकांची करडी नजरकुख्यात गुंड लाल्या उर्फ स्वप्नील पालकर हा अकाेला कारागृहात बंदिस्त असलेल्या एका कुख्यात गुंडाला भेटण्यासाठी कारागृह परिसरात गेला हाेता. यावेळी त्याने तुरुंग अधिक्षकांसाेबत वाद घालून धक्काबुक्की केली होती. या प्रकाराची जिल्हा पाेलिस अधिक्षक बच्चन सिंह यांनी गंभीर दखल घेतल्याचे या कारवाइवरुन समाेर आले आहे. ही कारवाइ गावगुंडांसाठी धाेक्याचा इशारा मानला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी