शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बुडीत क्षेत्रात बांध : सहा अधिका-यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 03:27 IST

अकोटचे उपविभागीय कृषी अधिकारी अशोक कंडारकर, तालुका कृषी अधिकारी एस.एम. मकासरे यांच्यासह सहा जणांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी कारणे दाखवा नोटिस बजावली.

ठळक मुद्देस्पष्टीकरण न मिळाल्याने अधीक्षक कार्यालयाचे स्मरणपत्र

सदानंद सिरसाट।लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पातूर तालुक्यातील भानोस येथील साखळी सिमेंट नाला बांध बुडीत क्षेत्रात निर्माण करून शासनाचा लाखो रुपये निधी पाण्यात घालविणाºया अकोटचे उपविभागीय कृषी अधिकारी अशोक कंडारकर, तालुका कृषी अधिकारी एस.एम. मकासरे यांच्यासह सहा जणांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी कारणे दाखवा नोटिस बजावली. त्याचे स्पष्टीकरण प्राप्त न झाल्याने त्या सर्वांना आता तीन दिवसांत ते सादर करण्याचे बजावण्यात आले आहे.जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने आधीच भानोस-२ या कोल्हापुरी बंधाºयाची निर्मिती केली आहे. भानोस येथे त्याच नाल्यावर पातूर तालुका कृषी विभागाने सिमेंट काँक्रिट नाला बांधांची कामे केली. कोल्हापुरी बंधाºयाच्या वरील बाजूस पाच साखळी सिमेंट काँक्रिट नाला बांध टाकण्यात आले. जवळपास सर्वच बांध कोल्हापुरी बंधाºयाच्या बुडीत क्षेत्रात आहेत.एक सिमेंट नाला बांध बंधाºयाच्या वरच्या बाजूस केवळ १५० मीटर अंतरावर आहे. अंदाजपत्रकात त्या बंधाºयाच्या साठ्याची लांबी ९०० मीटर आहे. याबाबतची तक्रार संजय सुरवाडे यांनी केली. त्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने २० एप्रिल २०१७ रोजी प्रसिद्ध केले. चौकशीसाठी अकोटचे उपविभागीय कृषी अधिकारी अशोक कंडारकर यांनाच नेमण्याचा प्रकार अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी केला. त्यानंतर गठीत समितीचा अहवाल प्राप्त होताच अधिकारी-कर्मचाºयांसह सहा जणांना कारणे दाखवा नोटिस बजावली; मात्र त्यापैकी कुणीही स्पष्टीकरण दिले नाही.‘लोकमत’च्या वृत्तानंतर स्मरणपत्राची आठवणचौकशी अहवालातील मुद्यांचे वृत्त ‘लोकमत’ने २१ जुलैच्या अंकात प्रसिद्ध केले. तोपर्यंत संबंधित अधिकाºयांचे स्पष्टीकरण का आले नाही, हे विचारण्याचीही तसदी अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने घेतली नाही. वृत्त प्रसिद्ध होताच संबंधिताने स्मरणपत्र तयार केले. त्यावर तीन दिवस अधीक्षक कृषी अधिकाºयांची स्वाक्षरीच न झाल्याने ते कार्यालयातच पडून असल्याची माहिती आहे.कंडारकर, मकासरे, फुलारी, डोंगरे यांना नोटिसभानोस पाणलोट क्षेत्रातील आय-१ ते आय-९ या बांधाच्या कामांसाठी कृषी सहायक अमोल इडोळे, पर्यवेक्षक आर. एस. फुलारी, मंडळ कृषी अधिकारी सागर डोंगरे, तालुका कृषी अधिकारी एस.एम. मकासरे, उपविभागीय कृषी अधिकारी अशोक कंडारकर यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून स्पष्टीकरण न आल्याने उद्या गुरुवारी त्यांना स्मरणपत्र दिले जाणार आहे.