शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

निवडणूकविषयक खर्च सादर न केल्यामुळे सहा उमेदवारांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 14:05 IST

१७ उमेदवारांपैकी सहा उमेदवारांनी अद्याप निवडणूक खर्चविषयक लेखे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमक्ष सादर केले नसल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : अकोट विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या १७ पैकी सहा उमेदवारांनी निवडणुकविषयक खर्च सादर केला नसल्याचे समोर आले आहे. या सहाही उमेदवारांना निवडणूक विभागाने नोटीस बजावली आहे.निवडणूक निरीक्षक (खर्च) यांनी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने अकोट विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चविषयक लेख्यांची तपासणी केली. यामध्ये एकूण १७ उमेदवारांपैकी सहा उमेदवारांनी अद्याप निवडणूक खर्चविषयक लेखे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमक्ष सादर केले नसल्याचे समोर आले आहे. यामध्ये अशोक किसनराव थोरात (अपक्ष), जितेंद्र बसवंत साबळे (अपक्ष), प्रमोद रामचंद्र खंडारे (अपक्ष), संतोष सूर्यभान देऊलकर (पीपल्स पार्टी आॅफ इंडिया), तुषार नाजूकराव पुंडकर (प्रहार जनशक्ती पार्टी), गजानन शांताराम तायडे (महाराष्ट्र परिवर्तन सेना) यांचा समावेश आहे. या सर्व उमेदवारांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.

विनापरवाना भाजपचा झेंडा लावणे भोवले! आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखलमूर्तिजापूर : परवानगी न घेता भाजपचा झेंडा वाहनावर लावल्याप्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलिसांनी भरारी पथकाच्या फि र्यादीवरून मालवाहू वाहन चालकाविरुद्ध १३ आॅक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात भरारी पथक गस्तीवर असताना मालवाहू वाहन क्र. एमएच ०१ एलए २११५ वर भाजपचा झेंडा लावलेला आढळला. यावेळी पथकातील रामराव जाधव, संदीप बोळे, संंतोष सोनोने व इतरांनी हे वाहन अडविले. वाहन चालकाला झेंडा लावण्याविषयी परवानगी मागितली असता त्याच्याकडे कुठलीही परवानगी आढळली नाही. त्यामुळे पथकाने वाहन जप्त करून मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला लावले. याप्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलिसांनी भरारी पथकाच्या फिर्यादीवरून वाहन चालक शे. वसीम शे. नजीम रा. अमरावती याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Akolaअकोलाakot-acअकोटmurtizapur-acमूर्तिजापूरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019