शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात ३०० पेक्षा जास्त बियाणे विक्रेत्यांना नोटीस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 10:23 IST

बियाणे विक्री परवान्यासोबतच रासायनिक खत विक्रेतेदेखील कृषी विभागाच्या रडारवर असल्याची माहिती आहे.

अकोला: यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या. या तक्रारीनंतर जिल्हा कृषी विभागाने कारवाईला सुरुवात करत जिल्ह्यातील ३०० पेक्षा जास्त बियाणे विक्रेत्यांना नोटीस बजावली आहे.यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाचे आगमन झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली; मात्र पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी जिल्ह्यातील विविध भागातून येऊ लागल्या. या तक्रारींचे गांभीर्य घेत कृषी विभागातर्फे कारवाईला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला बियाणे कंपन्यांविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केल्या, तर आता बियाणे विक्रेत्यांना नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात जवळपास ३०० पेक्षा जास्त कृषी केंद्र संचालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये दोषी आढळणाºया कृषी केंद्र संचालकांचे परवाने रद्द करण्याची कारवाई होऊ शकते, असेही कृषी विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. यापूर्वी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कृषी केंद्र संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या विरोधात कृषी व्यावसायिक संघातर्फे राज्यव्यापी आंदोलन केले होते.

खतांचे परवाने रद्द करण्याची तयारीबियाणे विक्री परवान्यासोबतच रासायनिक खत विक्रेतेदेखील कृषी विभागाच्या रडारवर असल्याची माहिती आहे. जवळपास २२ रासायनिक खत विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याच्या तयारीत कृषी विभाग आहे.

बियाणे न उगवल्याप्रकरणी बियाणे कंपन्यांसोबतच बियाणे विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. बियाणे विक्रेते दोषी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई होईल.- मोहन वाघ, जिल्हा कृषी अधीक्षक,अकोला.

शेतकºयांचे नुकसान होऊ नये, असे आम्हाला वाटते. कृषी विभागाने दिलेल्या नोटीसनुसार, त्यांना आवश्यक दस्तऐवजांची पूर्तता केली जाईल. जिल्ह्यात प्रमाणीत बियाण्यांचीच विक्री करण्यात आली आहे; मात्र ज्यांनी अप्रमाणीत बियाणे विक्री केली, अशांच्या पाठीमागे संघटना नाही.- मोहन सोनोने, कार्यकारी अध्यक्ष, जिल्हा व्यावसायिक संघ, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्र