शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

अकोल्यातील बँकांना प्राप्तिकर अधिकार्‍यांची नोटीस; आहुजा-मोटवाणी फर्मची तपासणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:28 IST

२00 अधिकार्‍यांच्या पथकातील काही अधिकारी परतले असले, तरी अजूनही या मोहिमेतील प्रमुख अधिकारी अकोल्यात तळ ठोकून आहेत. प्राप्तिकर अधिकार्‍यांनी  जवळपास ३५ बँकांना नोटीस बजाविली असून आहुजा-मोटवाणीशी संबंधित कोणतेही बँक खाते  असल्यास त्याची माहिती देण्याचे नोटीसद्वारे कळविले आहे. आता बँकेचे अधिकारी याला किती प्रतिसाद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ठळक मुद्देप्रमुख प्राप्तिकर अधिकारी अकोल्यात तळ ठोकून आहेतआहुजा-मोटवाणीशी संबंधित कोणतेही बँक खाते असल्यास त्याची माहिती देण्याचे नोटीसद्वारे कळविले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याच्या आरोपाखाली नागपूरच्या प्राप्तिकर अधिकार्‍यांनी ३१ जानेवारी रोजी येथील आहुजा-मोटवाणी यांच्या २१ फर्मवर छापा टाकून केलेली कारवाई पाचव्या दिवशीही सुरु होती. २00 अधिकार्‍यांच्या पथकातील काही अधिकारी परतले असले, तरी अजूनही या मोहिमेतील प्रमुख अधिकारी अकोल्यात तळ ठोकून आहेत. प्राप्तिकर अधिकार्‍यांनी  जवळपास ३५ बँकांना नोटीस बजाविली असून आहुजा-मोटवाणीशी संबंधित कोणतेही बँक खाते  असल्यास त्याची माहिती देण्याचे नोटीसद्वारे कळविले आहे. आता बँकेचे अधिकारी याला किती प्रतिसाद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.कोलकाता येथील शेअर बाजारातील संशयास्पद उलाढालीमुळे अकोल्यातील बेहिशेबी मालमत्ता प्रकरण उजेडात आले. प्राप्तिकर खात्याचे नागपूर विभागाचे डीआय (डायरेक्टर ऑफ इन्व्हेस्टिगेशन) जयराज काजला यांच्या निर्देशान्वये सहायक डीआय एस.पी.जी. मुदलियार यांच्या नेतृत्वात ३१ जानेवारी रोजी अकोल्यात सकाळी सहा वाजतापासून आहुजा-मोटवाणी ग्रुपच्या २१ फर्मवर सर्च मोहीम सुरू झाली आहे. कोठडी बाजारातील दयाराम अँन्ड सन्स, कॉटन मार्केटमधील धनराज ट्रेडर्स, वाशिम बायपासजवळील न्यू किराणा बाजारातील दयाराम अँन्ड सन्स, धनराज अँन्ड सन्स, एमआयडीसी चारच्या ग्रोथ सेंटरमधील दयाराम इंडस्ट्रिजमध्ये आणि मोटवाणी यांच्या दगडी पुलाजवळील सिंध हार्डवेअर, टिळक मार्गाच्या अलंकार मार्केटमधील रेणुका बिल्डिंगमधील मे. हकीकतराय अँन्ड सन्स, एमआयडीसीतील बीके चौकातील योगेश स्टिल आणि मोटवाणी यांचे पार्टनर तरुण कॉक री अँन्ड मेटल, या सदस्यांच्या पक्की-कच्ची खोलीतील निवासस्थानी ही झाडाझडती घेतली गेली. शनिवारपर्यंत अधिकार्‍यांनी २१ फर्मचे दस्तऐवज जप्त केलेत. आता या संपत्तीची माहिती जुळविण्याचे हिशेब सुरू आहे. अकोल्यातील तीन बॅंकांमधील लॉकर्सची झाडाझडती घेतली गेली असून, काही बँकांत नातेवाईकांच्या नावे रकमा आणि व्यवहार केल्याचा संशय प्राप्तिकर विभागाच्या अधिकार्‍यांना आहे.  

टॅग्स :Akola cityअकोला शहरIncome Taxइन्कम टॅक्स