शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता दुरुस्तीसाठी कंत्राटदाराला बजावली नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:29 IST

अकोला : जुने शहरातील भीमनगर चौक ते श्रीवास्तव चौक मार्गावर बांधण्यात आलेल्या ८४ मीटर लांब रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने लावून धरल्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाने शुक्रवारी संबंधित कंत्राटदाराला नोटीस जारी केली. नोटीसमध्ये मनपाच्या निकषानुसार रस्ता दुरुस्त करून देण्याचे निर्देश आहेत. 

ठळक मुद्देमनपाच्या बांधकाम विभागाचा निर्णय

प्रभाव लोकमतचालोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जुने शहरातील भीमनगर चौक ते श्रीवास्तव चौक मार्गावर बांधण्यात आलेल्या ८४ मीटर लांब रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने लावून धरल्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाने शुक्रवारी संबंधित कंत्राटदाराला नोटीस जारी केली. नोटीसमध्ये मनपाच्या निकषानुसार रस्ता दुरुस्त करून देण्याचे निर्देश आहेत. जुने शहरातील भीमनगर चौक ते महाराष्ट्र टेलर ते सार्वजनिक शौचालय तसेच सार्वजनिक शौचालय ते संजय शिरसाट यांच्या घरापर्यंत एकूण ८४. ७२ मीटर लांब सिमेंट रस्त्यासाठी महापालिकेने १२ लाख रुपयांची तरतूद केली. दोन टप्प्यात बांधलेल्या सिमेंट रस्त्याचे १२ लाख रुपयांपैकी सहा लाखांचे देयक संबंधित कंत्राटदाराला मनपाच्या बांधकाम विभागाने दिवाळीपूर्वी अदा केले. सिमेंट रस्त्याचे काम अतिशय सुमार दर्जाचे झाल्याचे समोर आल्यानंतर मनपाच्या बांधकाम विभागाने धावपळ सुरू केली. रस्त्याच्या कामावर देखरेख ठेवणारे उपअभियंता सईद अहमद यांनी त्यांचे कर्तव्य किती प्रामाणिकपणे पार पाडले, याचा नमुना समोर आला आहे. शिवाय, रस्त्याची पाहणी करून अहवाल सादर करणारे कार्यकारी अभियंता अजय गुजर, शहर अभियंता इक्बाल खान यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्हे उपस्थित झाली आहेत. या प्रकरणाचा ऊहापोह झाल्यानंतर बांधकाम विभागाने तडकाफडकी मानसेवी उपअभियंता सईद अहमद यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली, तसेच कंत्राटदार प्रदीप शिरसाट यांनाही नोटीस जारी केली असून, रस्ता दुरुस्तीचे निर्देश दिले आहेत.

निकषानुसार रस्ता दुरुस्त न केल्यास..प्रकरणाचा ऊहापोह झाल्यामुळे सुरुवातीला रस्त्यावर ‘पॅचिंग’ करून दिल्यास उर्वरित देयक अदा करण्याची भाषा वापरणार्‍या बांधकाम विभागाचा सूर आता बदलला आहे. पॅचिंगसाठी कमी खर्च येत असल्यामुळे कंत्राटदारही राजी झाला होता; परंतु रस्त्याची दुरवस्था ध्यानात घेता कंत्राटदाराने ‘विअरिंग कोर्स’नुसार रस्ता दुरुस्त करण्यासाठी प्रशासन आग्रही आहे. ‘विअरिंग कोर्स’नुसार रस्ता दुरुस्त न झाल्यास तो कोणत्याही क्षणी उखडण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.