शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पटसंख्येपेक्षा उपस्थित अल्प : ४० पेक्षाही अधिक वसतिगृह संचालकांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 14:24 IST

दोषी आढळलेल्या ४० पेक्षाही अधिक वसतिगृह संचालकांना उद्या शुक्रवारी नोटीस दिली जाणार आहे.

ठळक मुद्दे काही वसतिगृहात योग्य त्या सोयी काही प्रमाणात असल्याने त्यामध्ये सुधारणेसाठी समजपत्रही दिले जाणार आहे.अनेक वसतिगृह संचालक केवळ अनुदान लाटण्यासाठीच ते चालवित असल्याचे प्रकारही अनेकदा उघड झाले आहेत.वसतिगृहांचा अहवाल रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी प्राप्त होणार असल्याची माहिती आहे.

अकोला : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधेसाठी शासनाच्या अनुदानातून चालविल्या जाणाऱ्या वसतिगृहात आवश्यक त्या अनेक सुविधांच्या अभावासह पटसंख्येपेक्षा कमी उपस्थिती असल्याचा गंभीर प्रकार बुधवारी केलेल्या आकस्मिक चौकशीत उघड झाला आहे. याप्रकरणी दोषी आढळलेल्या ४० पेक्षाही अधिक वसतिगृह संचालकांना उद्या शुक्रवारी नोटीस दिली जाणार आहे. काही वसतिगृहात योग्य त्या सोयी काही प्रमाणात असल्याने त्यामध्ये सुधारणेसाठी समजपत्रही दिले जाणार आहे.जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या अखत्यारित स्वयंसेवी संस्थामार्फत वसतिगृहे चालविली जातात. त्यासाठी लाखो रुपये अनुदान शासनाकडून दिले जाते. त्या वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा, भोजनाची व्यवस्था आहे की नाही, याची तपासणी क्वचितच केली जाते. त्यामुळे अनेक वसतिगृह संचालक केवळ अनुदान लाटण्यासाठीच ते चालवित असल्याचे प्रकारही अनेकदा उघड झाले आहेत. या प्रकाराची तपासणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी धडक मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. बुधवारी जिल्ह्यातील ५१ वसतिगृहांची एकाच वेळी तपासणी करण्यात आली. जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहायकापासून ते प्रशासन अधिकारी पदापर्यंतच्या ५१ जणांच्या पथकांना कोणत्या मुद्यांवर तपासणी करावयाची, याचा नमुनाही देण्यात आला. त्यानुसार नेमून दिलेल्या वसतिगृहाचा चौकशी अहवाल संबंधितांनी गुरुवारी सादर केला. जिल्हा मुख्यालयापासून दूरवर असलेल्या वसतिगृहांचा अहवाल रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी प्राप्त होणार असल्याची माहिती आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती, उपलब्ध सोयी, भोजन, निवासाची व्यवस्था या सर्व बाबींसह त्या तुलनेत होत असलेल्या अनुदान मागणीचीही माहिती घेण्यात आली आहे. त्यामध्ये ४० पेक्षाही अधिक वसतिगृहांतील गैरसोयी पुढे आल्या. याप्रकरणी त्या सर्वांना कारणे दाखवा नोटीस दिली जात आहे. गुरुवारी ३० पेक्षाही अधिक नोटीस तयार झाल्या. उद्या एकत्रितपणे त्या सर्वांना दिल्या जाणार आहेत. या प्रकाराने जिल्ह्यातील वसतिगृह संचालकांचे पुन्हा एकदा धाबे दणाणले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला