शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

महिलांसाठी असलेल्या प्रशिक्षण योजनांसाठी लाभार्थीच नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:26 IST

अकोला : महिला विकास कार्यक्रमातून महिलांना सक्षम  करण्यासाठी चालू वर्षात मंजूर असलेल्या प्रशिक्षण योजनांसाठी  लाभार्थी अर्जच प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे हा निधी प्रकल्प स् तरावर खर्च करण्यासाठी देण्याबाबतची चर्चा सोमवारी महिला  व बालकल्याण समितीच्या तहकूब सभेत झाली. गेल्यावर्षी  प्रशिक्षण योजना बारगळल्या होत्या, हे विशेष. 

ठळक मुद्देवैयक्तिक लाभार्थी यादी मंजूर 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महिला विकास कार्यक्रमातून महिलांना सक्षम  करण्यासाठी चालू वर्षात मंजूर असलेल्या प्रशिक्षण योजनांसाठी  लाभार्थी अर्जच प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे हा निधी प्रकल्प स् तरावर खर्च करण्यासाठी देण्याबाबतची चर्चा सोमवारी महिला  व बालकल्याण समितीच्या तहकूब सभेत झाली. गेल्यावर्षी  प्रशिक्षण योजना बारगळल्या होत्या, हे विशेष. महिला सक्षमीकरणासाठी मंजूर असलेल्या प्रशिक्षण  कार्यक्रमामध्ये महिला समुपदेशन केंद्र चालवणे, दुग्धजन्य पदा र्थांचे उत्पादन करणे, ७ ते १२ वी उत्तीर्ण मुलींना संगणक   प्रशिक्षण, मोबाइल, संगणक दुरुस्ती, बेकिंग व कॅटरिंग  प्रशिक्षण, ग्रामीण भागातील महिला व मुलींना नर्स, परिचारिकेचे  प्रशिक्षण देणे, सौंदर्य प्रसाधने प्रशिक्षण, पदवीधर मुलींना  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण, मराठी व  इंग्रजी टायपिंग, किशोरवयीन मुली व महिलांना जेंडर, आरोग्य,  कुटुंबनियोजन कायदेविषयक प्रशिक्षण, शिवणकाम, फॅशन  डिझायनिंग प्रशिक्षण, बालवाडीसेविका, मदतनीस यांच्यासाठी  प्रशिक्षण, महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण योजनांचा  समावेश आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेकडून अर्जही मागवण्यात  आले. मात्र, एकही अर्ज प्राप्त झाला नाही. त्यामुळे हा निधी  खर्च करण्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकार्‍यांना दिला  जाणार आहे. सभेला सभापती देवका पातोंड, सदस्य माया  कावरे, ज्योत्स्ना बहाळे, वेणू चव्हाण, रमीजाबी शेख साबीर,  मंजूषा वडतकार, मंगला तितूर, आशा एखे यांच्यासह महिला व  बालकल्याण अधिकारी योगेश जवादे उपस्थित होते. 

वैयक्तिक लाभार्थी यादी मंजूर सभेत वैयक्तिक लाभाच्या योजनांची यादी मंजूर करण्यात  आली. त्यामध्ये सायकल, पिको फॉल मशीन, शिलाई मशीन,  सौर कंदील योजनेचा समावेश आहे. त्यामध्ये तीनही  योजनांसाठी अकोट तालुक्यातील १६0, मूर्तिजापूर-१५५, पा तूर-७८, बाळापूर-१३७, अकोट-२६१, बाश्रीटाकळी-२३५  लाभार्थींचा समावेश आहे, तर अकोला तालुक्यातील लाभार्थी  संख्या उशिरापर्यंत प्राप्त झाली नव्हती.