शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

केवळ कौतुकाच्या थापीने पोट भरत नाही, कामाला सन्मान मिळाला पाहीजे - संध्या पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 20:54 IST

आशा स्वयंसेविकांना सेवेत कायम करण्याची गरज आहे, असे मत आशा वर्कर व गटप्रवर्तक संघटनेच्या जिल्हा सचिव संध्या पाटील यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

अकोला : आशा स्वयंसेविकांना करावी लागणारी कामे, कामाचा मिळणारा मोबदला लक्षात घेता, केवळ कौतुकाच्या थापीने पोट भरणार नाही तर त्यांच्या कामाला योग्य सन्मान मिळाला पाहीजे. त्यासाठी शासनाने आशा स्वयंसेविकांना सेवेत कायम करण्याची गरज आहे, असे मत आशा वर्कर व गटप्रवर्तक संघटनेच्या जिल्हा सचिव संध्या पाटील यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. काम करताना येणाऱ्या विविध समस्यांचा सामना करण्यासाठी आशा स्वयंसेवकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगीतले.आशा स्वयंसेविकांचे काम व मोबदल्याचे स्वरुप कसे आहे?आशा स्वयंसेवकांना सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये आरोग्य सर्वेक्षणासह आरोग्य विभागांतर्गत विविध सर्वेक्षणाची कामे करावी लागतात. मात्र कामावर आधारित मोबदला मिळत नाही. दरमहा केवळ तीन ते साडेतीन हजार रुपये मोबदला मिळतो. काम जास्त आणि मोबदला अत्यल्प मिळत असल्याने उदरनिर्वाह कसा चालविणार, असा प्रश्न सतावतो.सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजनांची गरज आहे का?आशा स्वयंसेविकांना गावातील प्रत्येक घरात जाऊन आरोग्य सर्वेक्षणात माहती संकलीत करण्याचे काम करावे लागते. त्यामध्ये अनेकदा वाद आणि मारहाणीच्या प्रसंगाचा सामना करावा लागतो. त्यामुळे आशा स्वयंसेविकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने शासनाने उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे.कोरोना काळात काम करताना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो?घरोघरी आरोग्य सर्वेक्षणाच्या कामात आशा स्वयंसेविकांना घरातील सर्व सदस्यांची नावे नोंदवून आॅक्सीजन पातळी, तापमान, कोवीडची लक्षणे आदी प्रकारची माहिती वर्गीकरण करुन माहिती मोबाईल अ‍ॅपमध्ये संकलीत करण्याचे सांगण्यात आले.परंतू अनेक आशा स्वयंसेविकांकडे स्मार्टफोन नसल्याने, ही माहिती आॅनलाईन संकलीत कशी करणार, याबाबतच्या समस्येचा सामना त्यांना करावा लागत आहे.दिवसभर केलेल्या कामाचा मोबदला केवळ १५० रुपये मिळत असून‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या मोहिमेत गठित करण्यात आलेल्या आरोग्य पथकातील इतर सदस्यांनी सर्वेक्षण करण्यास नकार दिल्याने, आरोग्य सर्वेक्षणाच्या कामाचा भार आशा स्वयंसेविकांना सहन करावा लागत आहे. मास्क, सॅनिटाझर, टोपी, टी-शर्ट इत्यादी साहित्य अद्यापही मिळाले नाही.कामाच्या मोबदल्यासंदर्भात काय मागणी आहे?आशा स्वयंसेविकांना कराव्या लागणाºया कामांचा विचार करुन, त्याआधारे इतर राज्यांप्रमाणे राज्यातील आशा स्वयंसेविकांना कामाचा मोबदला म्हणून शासनाने दरमहा किमान दहा हजार रुपये मानधन दिले पाहीजे.

टॅग्स :Akolaअकोलाinterviewमुलाखत