शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट खत नव्हे?; राखेची मध्य प्रदेशात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 10:54 IST

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या खताचे नमुने घेतले असून प्राथमिक तपासणीत या गोणींमध्ये राख असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : स्थानिक गुन्हे शाखा तसेच डाबकी रोड पोलिसांनी अमानतपूर ताकोडा येथून सोमवारी बनावट खतांच्या २४० गोणी असलेला एक ट्रक ताब्यात घेतला होता; मात्र मंगळवारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या खताचे नमुने घेतले असून प्राथमिक तपासणीत या गोणींमध्ये राख असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे तपासणीसाठी नागपूरच्या प्रयोग शाळेत पाठविण्यात आले असून. या तपासणीचा अहवाल आल्यानंतर फौजदारी कारवाई करण्याची दिशा ठरणार असल्याची माहिती कृषी अधिकारी व पोलिसांनी दिली.अमानतपूर ताकोडा येथे अनिल कुटे पाटील यांचे पाटील अ‍ॅग्रो टेक इंडिया लॅब नावाने प्रतिष्ठान आहे. या ठिकाणावरून ते पारस येथील औष्णिक वीज केंद्रातील राख गोणीमध्ये पॅकिंग करून विक्री करतात. यासोबतच विविध प्रकारच्या शेतीसाठी लागणाºया टॉनिकची निर्मिती करण्यात येत असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत समोर आल्याची माहिती कृषी विभागाचे अधिकारी जंजाळ आणि लोखंडे यांनी दिली. ताब्यात घेण्यात आलेल्या राखेच्या पोत्यांवर कुठेही खत असल्याचा उल्लेख नसल्याने ते राखेचीच विक्री करीत असल्याची माहिती त्यांनी दिली; मात्र त्यानंतरही त्यांनी राखेचे नमुने घेतले असून, या राखेच्या माध्यमातून ते खताची विक्री करीत असल्याचे किंवा या राखेमध्ये खत असल्याचे काहीही आढळल्यास अनिल पाटील यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा कृषी विभागाच्या अधिकाºयांनी दिला.

खत आहे की नाही, याबाबत साशंकता! पोलिसांनी जप्त केलेल्या बनावट खताच्या बॅगवर सिलिका पॉवर नमूद आहे. त्यामुळे हे खत आहे की नाही, या बाबत कृषी विभागाच्या अधिकाºयांनी शंका व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बºहाणपूरमध्ये राखेची खरेदीसांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील पंकज शिरभाते यांच्या आदित्य अ‍ॅग्रो केअर या कंपनीकडून प्राप्त झालेल्या खाली गोण्यांमध्ये अमानतपूर ताकोडा येथे राख भरून त्याचे ट्रक बºहाणपूर येथे पाठविण्यात येते. या ठिकाणी शेतकरी, तसेच मूर्ती बनविण्यासाठी आणि साचे बनविण्यासाठी या राखचा उपयोग करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे; मात्र नेमका हाच उपयोग होतो की नाही, हा तपासाचा भाग आहे.

शेतकºयांच्या फसवणुकीचा धोकाअनिल कुटे हे राखेची विक्री मध्य प्रदेशातील बºहाणपूर येथे करीत असल्याचे समोर आले. त्याचे देयकही देण्यात आले असले तरी मध्य प्रदेशातील शेतकºयांना खत म्हणून राख त्यांच्या माथी मारण्यात येते का, या बाबीचा तपास करण्याची गरज आहे. या ठिकाणावरून राख नेल्यानंतर मध्य प्रदेशात ती खतात मिसळून विक्री करण्याचा धोका असल्याची दाट शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या दिशेने तपास करण्याची गरज आहे.

पोलिसांनी जप्त केलेल्या राखेचे नमुने घेण्यात आले असून, ते चाचणीसाठी नागपूर येथील लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे. यामध्ये ते बनावट खत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर निश्चितच कारवाई होईल.- नितीन लोखंडे, गुण नियंत्रक, कृषी विभाग, अकोला

टॅग्स :AkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्र