शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट रस्ता नव्हे, कॅनाॅलवर हाेणार खडीकरण, एकाच बाजूने हाेणार सर्विस रस्ता; कॅनाॅल हस्तांतरणाचा तिढा कायम

By आशीष गावंडे | Updated: April 29, 2023 18:39 IST

पावसाळ्यात नागरिकांच्या राेषाचा सामना करावा लागण्याची शक्यता, पाहता आता कॅनाॅलच्या एका बाजूने अवघा २० फुट रूंद सर्विस रस्त्याचे खडीकरण केले जाणार असल्याची माहिती आहे. 

अकाेला : पावसाळ्यापूर्वी ११० फुट रुंद कॅनाॅल जमिनीचे हस्तांतरण हाेउन दर्जेदार रस्ता तयार हाेइल, ही अकोलेकरांची अपेक्षा फाेल ठरली आहे. महापालिका,जिल्हाप्रशासन व पाटबंधारे विभागाच्या लालफितशाहीत कॅनाॅल रस्ता रखडला आहे. पावसाळ्यात नागरिकांच्या राेषाचा सामना करावा लागण्याची शक्यता, पाहता आता कॅनाॅलच्या एका बाजूने अवघा २० फुट रूंद सर्विस रस्त्याचे खडीकरण केले जाणार असल्याची माहिती आहे.  जुने शहरातील डाबकी राेड अत्यंत अरुंद असल्यामुळे या भागात वाहतूक काेंडीच्या समस्येत भर पडली असून डाबकी राेडला पर्यायी रस्त्याची गरज निर्माण झाली. यातूनच कॅनाॅल रस्त्याचा पर्याय समाेर आला. संत गाेराेबा मंदिर ते मेहरे नगर ते बाळापूर राेड तसेच थेट शिवसेना वसाहतमधून राष्ट्रीय महामार्गा पर्यंत हा रस्ता झाल्यास डाबकी राेडवरील वाहतुक व्यवस्थेवरील ताण कमी हाेणार असल्याने मनपा प्रशासनाने २०१२ मध्ये पहिल्यांदा या रस्त्यासाठी निविदा प्रसिध्द केली हाेती. त्यानंतर २०१६ मध्ये तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी कॅनाॅल जमिनीचे सातबारा व फेरफार नाेंदीचे काम हाती घेतले हाेते. ही क्लिष्ट प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तत्कालीन आयुक्त जितेंद्र वाघ यांनी मनपाच्या सर्वसाधारण सभेत कॅनाॅल रस्त्याचा ठराव मंजूर करून घेत शासनाकडे सादर केला हाेता. यानंतर ही प्रक्रिया थंडबस्त्यात गेली. मध्यंतरी ही जमिन हस्तांतरित करण्याचा तिढा जिल्हाप्रशासनाच्या दालनात गेला हाेता. परंतु आजपर्यंतही ११० फुट रुंद कॅनाॅल जागेच्या हस्तांतरणाचा तिढा कायम असल्याचे दिसत आहे. 

तांत्रिक त्रुटी कायमकॅनाॅल जमिन हस्तांतरणाच्या मुद्यावरुन जिल्हाप्रशासन व मनपा प्रशासनाने तांत्रिक त्रुटी निकाली काढणे अपेक्षित हाेते. पावसाळ्यात नागरिकांचे हाल हाेतील, हे ध्यानात घेऊन केवळ एका बाजूने २० फुट रुंदीचे खडीकरण केले जाइल. यासाठी मनपाने निविदा मंजूर करीत कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश दिले आहेत. 

कॅनाॅलचा मध्य (सेंटर) काढला कसा?रेणूका नगरच्या बाजूने अधिकृत लेआऊट असून मेहरे नगरच्या बाजूने गुंठेवारी जमिन आहे. मनपाच्या नगररचना विभागाने लेआऊट गृहीत धरुन त्यापुढे सुमारे ३० मीटरची जमिन कॅनाॅलची असल्याचे सांगत सर्विस रस्ता तयार करण्यासाठी मध्य (सेंटर) काढला. हा प्रकार पाहता एकाच बाजूने सर्विस रस्ता कसा, असा सवाल उपस्थित झाला आहे.

टॅग्स :Akolaअकोला