शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

गैरहजर डॉक्टर, कर्मचार्‍यांना नोटीस बजावण्याचा आदेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 01:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी त्यांच्या आरोग्य जनता दरबार उपक्रमांतर्गत सोमवारी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला भेट देऊन विविध वॉर्डची पाहणी केली. तसेच रुग्णांची विचारपूस करून त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या. यावेळी कर्तव्याला दांडी मारणार्‍या डॉक्टर, कर्मचार्‍यांच्या मुद्यावरून पालकमंत्र्यांनी रुग्णालय प्रशासनाला चांगलेच ...

ठळक मुद्देसवरेपचार रुग्णालय पालकमंत्र्यांनी घेतली रुग्णालय प्रशासनाची झाडाझडती

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी त्यांच्या आरोग्य जनता दरबार उपक्रमांतर्गत सोमवारी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला भेट देऊन विविध वॉर्डची पाहणी केली. तसेच रुग्णांची विचारपूस करून त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या. यावेळी कर्तव्याला दांडी मारणार्‍या डॉक्टर, कर्मचार्‍यांच्या मुद्यावरून पालकमंत्र्यांनी रुग्णालय प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. विनापरवानगी कर्तव्यावर गैरहजर राहणार्‍या डॉक्टर, कर्मचार्‍यांना नोटीस बजावण्याचा आदेश पालकमंत्र्यांनी यावेळी दिला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सोमवारी आयोजित जनता आरोग्य दरबारच्या निमित्याने पालकमंत्र्यांनी रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चौहान, प्रशासकीय अधिकारी संजय देशमुख हे उपस्थित होते. प्रारंभी रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ६  व ७ मध्ये जाऊन त्यांनी रुग्णांची भेट घेतली.  त्यांची सहानुभूतीने विचारपूस करून त्यांना मिळणार्‍या आरोग्यसेवेबाबत चौकशी केली. कर्तव्यावर असणारे  डॉक्टर, पारिचारिका व इतर  कर्मचारी यांचीही चौकशी करून  रुग्णांना चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा देण्याबरोबरच वॉर्ड व स्वच्छतागृह  स्वच्छ ठेवण्याचे  निर्देश दिले. रुग्णालयातील स्वच्छता, डॉक्टर व कर्मचार्‍यांची उपस्थिती याबाबत त्यांनी माहिती जाणून घेत प्रत्यक्ष पाहणी केली. रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा पुरविण्याबरोबरच रुग्णालयातील सुविधांबाबत वैद्यकीय अधिकार्‍यांनी सजग राहावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.  

आरोग्य जनता दरबारात दोन तक्रारीदरम्यान, आज झालेल्या जनता आरोग्य  दरबारात दोन तक्रारी प्राप्त  झाल्या. प्राप्त तक्रारींचे तातडीने निराकरण  करण्याची सूचना त्यांनी  संबंधित अधिकार्‍यांना  केली. यावेळी डॉ. कार्यकर्ते  यांनी महाविद्यालय व रुग्णालयाबाबतच्या अडचणी मांडल्या. रुग्णालयात परिचारिका व कर्मचार्‍यांची  पदभरती, सुपरस्पेशालिटी रुग्णालयात नवीन पदांची निर्मिती याबाबतची माहिती त्यांनी पालकमंत्र्यांना दिली.

क्ष-किरण विभागाची झाडाझडतीसवरेपचार रुग्णालयातील क्ष-किरण विभागासंदर्भात रुग्णांच्या तक्रारी वाढत असल्याच्या पृष्ठभूमीवर पालकमंत्र्यांनी क्ष-किरण विभागाला भेट दिली. यावेळी या विभागात केवळ दोन कर्मचारी कर्तव्यावर असल्याचे दिसून आले. पालकमंत्र्यांनी या विभागातील कर्मचार्‍यांची माहिती घेऊन, अनुपस्थित असलेल्या डॉक्टर व कर्मचार्‍यांना नोटीस बजावण्याचा आदेश अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांना दिला. त्यानुसार या कर्मचार्‍यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. रुग्णालय परिसरातील अस्वच्छेतेवरूनही पालकमंत्र्यांनी ताशेरे ओढत स्वच्छता निरीक्षकास नोटीस बजावण्याचा आदेश दिला.

टॅग्स :Akola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयDr.Ranjit Patilडॉ.रणजीत पाटील