शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

मनपा शिक्षकांच्या बदलीचा पोळा फुटणार!

By admin | Updated: June 6, 2017 00:52 IST

आयुक्त लहाने यांचे निर्देश: उपायुक्त सरसावले

आशिष गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : एकाच शाळेवर मागील पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून ठाण मांडलेल्या शिक्षकांची बदली करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी घेतला आहे. तसे निर्देश शिक्षण विभागाला दिले असले तरी या विभागाचा ढिम्म कारभार पाहता बदली प्रक्रियेसाठी उपायुक्त समाधान सोळंके सरसावल्याची माहिती आहे. महापालिकेतील शिक्षण विभागाच्या भ्रष्ट कारभाराची संपूर्ण राज्यात ख्याती आहे. मागील दहा वर्षांच्या कालावधीत या विभागातील अधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या एकदा-दोनदा नव्हे तर प्रत्येक वर्षाला थातूर-मातूर बदली प्रक्रिया राबवली. शिक्षक संघटनेत दुकानदारी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यावेळी पैसे मोजा आणि पाहिजे त्या शाळेत बदली करून घ्या, असा अघोषित फतवा शिक्षण विभागाने जारी केला होता. त्यामुळे शिक्षक संघटनेतील कुरघोडीच्या राजकारणाचा परिणाम आपसूकच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर झाला. विद्यार्थ्यांची पटसंख्या कमालीची रोडावली. शाळा इमारतींची दुरवस्था झाली. अशा स्थितीत शिक्षण विभागाला ताळ्यावर आणण्यासाठी महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी ठोस आणि दूरगामी निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. गतवर्षी एकाच शाळेवर १५ वर्षांपेक्षा जास्त काळ ठाण मांडून बसलेल्या ७० पेक्षा जास्त शिक्षकांची बदली करून शिक्षण विभागाच्या मनमानी कारभाराला हादरा दिला होता. यावर्षी आयुक्त लहाने यांनी ज्या शिक्षकांना एकाच शाळेवर पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला असेल त्यांची इतर शाळेवर बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे निर्देश शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत.संघटनांचे पदाधिकारी हतबलमनपा आयुक्तांच्या भूमिकेमुळे शिक्षण विभागाच्या माध्यमातून स्वत:चे उखळ पांढरे करून घेणाऱ्या शिक्षक संघटनेतील काही पदाधिकाऱ्यांच्या दुकानदारीला लगाम लागल्यामुळे सदर पदाधिकारी हतबल ठरल्याचे बोलल्या जात आहे. या विभागातील अधिकाऱ्यांच्या कामकाजावर आयुक्तांची करडी नजर असून, येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात उलटफेर होण्याचे संकेत आहेत.पहिल्यांदाच बिंदू नामावली तयारमनपाची स्थापन झाल्यापासून ते आजपर्यंत शिक्षकांची बिंदू नामावली तयार करण्यासाठी शिक्षण विभागाने कधीही पुढाकार घेतला नाही. खाबुगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक बिंदू नामावली तयार केली नाही. परिणामी खिसे जड करणाऱ्या शिक्षकांना नियमबाह्यरीत्या पदोन्नत्या व विविध भत्त्त्यांचा लाभ देण्यात आला. आयुक्त लहाने यांनी बिंदू नामावली तयार केल्यामुळे शिक्षण विभागातील भोंगळ कारभाराला लगाम लागला आहे.उपायुक्तांकडे सोपवली जबाबदारीशिक्षण विभागातील दुकानदारी लक्षात घेता बदली होणाऱ्या शिक्षकांची यादी तयार करण्याची जबाबदारी आयुक्त लहाने यांनी उपायुक्त समाधान सोळंके यांच्याकडे सोपवली आहे. सोळंके यांनी प्राथमिक यादी तयार केल्याची माहिती असून, येत्या तीन-चार दिवसांत अंतिम यादीवर शिक्कामोर्तब केले जाईल.