शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मनपा हद्दवाढीतील मालमत्ताधारकांना मिळणार अकृषक परवानगीची सनद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 13:07 IST

अकोला : महानगरपालिका हद्दवाढीत समाविष्ट २२ गावांमधील ९८० मालमत्ताधारकांना जमीन अकृषक परवानगीची सनद देण्याची प्रक्रिया अकोला तहसील कार्यालयामार्फत सुरू करण्यात आली आहे.

अकोला : महानगरपालिका हद्दवाढीत समाविष्ट २२ गावांमधील ९८० मालमत्ताधारकांना जमीन अकृषक परवानगीची सनद देण्याची प्रक्रिया अकोला तहसील कार्यालयामार्फत सुरू करण्यात आली आहे.अकोला महानगरपालिका हद्दवाढीमध्ये शहरानजीकची २२ गावे समाविष्ट करण्यात आली. हद्दवाढीच्या क्षेत्रात ५०६ सर्व्हे नंबरमध्ये कृषक जमीन असलेल्या ९८० मालकमत्ताधारकांना जमिनीची अकृषक परवानगी घेण्यासंदर्भात अकोला तहसील कार्यालयामार्फत सहा महिन्यांपूर्वी नोटीस बजाविण्यात आल्या होत्या. त्यानुसार महानगरपालिका प्रशासनाकडून विकास परवानगी घेतलेल्या मालमत्ताधारकांना जमीन अकृषक परवानगीची सनद देण्याची प्रक्रिया अकोला तहसील कार्यालयामार्फत सुरू करण्यात आली आहे. मनपा हद्दवाढ क्षेत्रातील ९८० मालमत्ताधारकांपैकी ११ जानेवारीपर्यंत सहा मालमत्ताधारकांना त्यांच्या जमिनीची अकृषक परवानगीची सनद देण्यात आली आहे. मनपाकडून विकास परवानगी घेतल्याचा दस्तऐवज सादर केल्यानंतर उर्वरित मालमत्ताधारकांनाही जमीन अकृषक परवानगीची सनद तहसील कार्यालयामार्फत देण्यात येणार आहे.हद्दवाढीमध्ये समाविष्ट अशी आहेत गावे!मनपा हद्दवाढीमध्ये शहरानजीक असलेल्या खरप बु., शिलोडा, नायगाव, वाकापूर, अक्कलकोट, शहानवाजपूर, सुकापूर, तपलाबाद, निझामपूर, अकोली बु., अकोली खुर्द, हिंगणा म्हैसपूर, सोमठाणा, खडकी बु., मलकापूर, शिवणी, शिवर, उमरी, उमरखेड, डाबकी व शिवापूर इत्यादी गावांचा समावेश आहे. या गावांत कृषक जमिनी असलेल्या मालमत्ताधारकांनी मनपाकडून विकास परवानगी घेतल्यानंतर त्यांना जमीन अकृषक परवानगीची सनद देण्याचे काम तहसील कार्यालयाकडून सुरू करण्यात आले. 

मनपा हद्दवाढ क्षेत्रातील ९८० मालमत्ताधारकांना जमीन अकृषक करण्याच्या नोटीस बजाविण्यात आल्या होत्या. त्यापैकी ज्यांनी मनपाकडून विकास परवानगी घेतली आहे, अशा मालकमत्ताधारकांना जमीन अकृषक परवानगीची सनद देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत सहा मालमत्ताधारकांना जमीन अकृषक परवानगीची सनद देण्यात आली आहे.-विजय लोखंडे,तहसीलदार, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका