अकोला: विविध समस्यांनी ग्रासलेल्या सर्वोपचारमध्ये रुग्णांनाच नाही, तर डॉक्टर अन् इतर कर्मचाऱ्यांना प्यायला पाणी नाही. रुग्णालय परिसरात एकाच ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली आहे; परंतु त्या परिसरातही अस्वच्छता पसरली आहे.केवळ रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनाच नाही, तर डॉक्टर व इतर कर्मचाºयांनाही सर्वोपचारमध्ये विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अस्वच्छता, दुर्गंधीसोबतच डॉक्टर व कर्मचाºयांना पिण्याच्या पाण्याचीही समस्या गंभीर आहे. सर्वोपचार परिसरात एका ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली; परंतु या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी अस्वच्छतेतून जावे लागते. त्यामुळे बहुसंख्य लोक या ठिकाणी जाण्यास टाळतात. तर सर्वोपचारमधील विविध ठिकाणी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असली, तरी त्या ठिकाणी पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे येथील डॉक्टर, कर्मचाºयांना पिण्याचे पाणी बाहेरून आणावे लागते.उन्हाळ््यापूर्वी प्रश्न सुटण्याची आसऋतू बदलास सुरुवात झाली असून, सर्वोपचारमधील पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर स्वरूप धारण करणार आहे; परंतु याकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे दुर्लक्ष असून, उन्हाळ््यापूर्वी हा प्रश्न सुटणार की नाही, अशी आस येथील डॉक्टरांसह इतर कर्मचारी लावून आहेत.पाण्याची यंत्रणा बंदसर्वोपचारमध्ये ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली आहे; मात्र ही यंत्रणा बंद असून धूळ खात पडली आहे. परिणामी यंत्रणा असूनही कर्मचाºयांना पिण्यासाठी पाणी नाही.