शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

कचऱ्यावर प्रक्रिया नाहीच; प्रकल्प रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 17:47 IST

नागरी स्वायत्त संस्थांमध्ये कचºयावर प्रक्रिया करणारा प्रकल्प कार्यान्वित होऊ शकला नसल्याचे समोर आले आहे.

अकोला: स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत घनकचºयाचे विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ‘डीपीआर’(प्रकल्प अहवाल) तयार करण्याचे राज्य शासनाचे निर्देश होते. त्यानुषंगाने राज्यातील चार महापालिकांसह नऊ शहरांनी सादर केलेल्या ‘डीपीआर’ला मंजुरी देत तत्कालीन मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने १७२ कोटी ५१ लाख रुपये निधी मंजूर केला होता. हा निधी महापालिकांना प्राप्त झाला असला तरी प्रकल्प कार्यान्वित होऊ शकले नसल्याची माहिती समोर आली आहे.केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविले जात असून, शहरात निर्माण होणाºया ओला व सुका कचºयाचे विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात शासनाकडून वारंवार दिशानिर्देश दिले जात आहेत. घनकचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकांसह नागरी स्वराज्य संस्थांकडे सक्षम यंत्रणा नसल्यामुळे शासनाने ‘डीपीआर’(सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्यासाठी ‘मार्स’ नामक एजन्सीची नियुक्ती केली होती. संबंधित एजन्सीने विदर्भातील महापालिकांसह राज्यातील इतर महापालिका, नगर परिषदांसाठी ‘डीपीआर’ तयार केला. या डीपीआरला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर नागपूर येथील निरी संस्थेमार्फत मूल्यांकन करण्यात आले. हा डीपीआर जानेवारी २०१९ मध्ये तत्कालीन मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीकडे सादर करण्यात आला होता. उच्चाधिकार समितीच्या बैठकीत चार महापालिकांसह नऊ शहरांच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी देत १७२ कोटी ५१ लाख निधी वितरित करण्याला मंजुरी दिली होती. यामध्ये अकोला महापालिकेला ४५ कोटी ३५ लाख निधी प्राप्त झाला. याव्यतिरिक्त अहमदनगर, भिवंडी-निजामपूर, मीरा-भार्इंदर, जत नगर परिषदेचा समावेश आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी केंद्र व राज्य शासनाच्या निधीचा समावेश असून, त्यामध्ये महापालिका, नागरी संस्थांना आर्थिक हिस्सा जमा करणे बंधनकारक असले तरी मागील सव्वा वर्षापासून संबंधित नागरी स्वायत्त संस्थांमध्ये कचºयावर प्रक्रिया करणारा प्रकल्प कार्यान्वित होऊ शकला नसल्याचे समोर आले आहे.बांधकाम कचरा प्रक्रियेसाठी निधीयापुढे बांधकामादरम्यान निर्माण होणाºया कचºयावर प्रक्रिया केली जाईल. त्यासाठी उभारल्या जाणाºया प्रकल्पासाठी राज्यातील १९ महापालिकांना शासनाने १०५ कोटी १४ लाख रुपये मंजूर केले असून, त्यामध्ये पश्चिम विदर्भातील अकोला व अमरावती या दोन स्वायत्त संस्थांना प्रत्येकी पाच कोटींचा निधी दिला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका