शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ब्लिचिंग पावडर पुरवठ्यासाठी निविदेला फाटा; सहा वर्षांपासून एकाच पुरवठादाराला मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 12:48 IST

जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात तब्बल ८४ महिन्यांपासून एकाच पुरवठादाराकडून ब्लिचिंग पावडर खरेदी करण्याचा प्रताप केला जात आहे.

ठळक मुद्दे सातत्याने पुरवठादारालाच मुदतवाढ देत निविदा प्रक्रियेला फाटा देण्याचा प्रकार यानिमित्ताने उघड होत आहे. मे. इन्नाणी एंटरप्रायजेस यांनाच पुरवठा करण्यासाठी ३१ मार्च २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांनी, तर निविदा प्रक्रिया अंतिम होईपर्यंत त्याच पुरवठादाराकडून ब्लिचिंग खरेदीला मंजुरी दिली.

अकोला : केवळ बारा महिन्याच्या कालावधीसाठी पुरवठा करण्याचा करार असताना जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात तब्बल ८४ महिन्यांपासून एकाच पुरवठादाराकडून ब्लिचिंग पावडर खरेदी करण्याचा प्रताप केला जात आहे. पाणी पुरवठा विभागासह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही सातत्याने पुरवठादारालाच मुदतवाढ देत निविदा प्रक्रियेला फाटा देण्याचा प्रकार यानिमित्ताने उघड होत आहे.जिल्ह्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांतून शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ब्लिचिंग पावडर, अ‍ॅलमची खरेदी पाणी पुरवठा विभागाकडून केली जाते. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून पुरवठादार नियुक्त करावा लागतो. जिल्हा परिषदेने २०११-१२ या वर्षात ब्लिचिंग पावडर खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबवली. त्यावेळी निवड झालेल्या पुरवठादारासोबत ३१ मार्च २०१२ पर्यंत पुरवठ्याचा करार झाला होता. त्यानंतरच्या कालावधीत ब्लिचिंग पावडर पुरवठादार निवड करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवणे आवश्यक होते. मात्र, पाणी पुरवठा विभागातील संबंधित अधिकाºयांनी ती प्रक्रियाच सुरू केली नाही. त्याऐवजी आधीच ठरलेला पुरवठादार कारंजा लाड येथील मे. इन्नाणी एंटरप्रायजेस यांनाच पुरवठा करण्यासाठी ३१ मार्च २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडून प्रशासकीय मान्यताही घेण्यात आली. त्यानंतरही निविदा प्रक्रिया सुरू झाली नाही. त्याऐवजी दुसºयांदा मुदतवाढ घेत ती ३१ मार्च २०१६ पर्यंत करण्यात आली. त्यानंतर ३० जून २०१६ अशी सातत्याने मुदतवाढ घेण्यात आली. आधीच पाच वर्ष सातत्याने मुदतवाढ दिल्यानंतर २९ आॅगस्ट २०१६ रोजी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांनी, तर निविदा प्रक्रिया अंतिम होईपर्यंत त्याच पुरवठादाराकडून ब्लिचिंग खरेदीला मंजुरी दिली. या प्रकारामुळे पाणी पुरवठा विभागाने ठरलेल्या कालावधीत निविदा प्रक्रिया आधीच का राबवली नाही. ठरावीक पुरवठादाराकडूनच ब्लिचिंग पावडर खरेदीचा अट्टहास पाणी पुरवठा विभागातील संबंधित अधिकारी-कर्मचारी यांचा का आहे, यासह अनेक बाबी शंकास्पद आहेत.

१५ लाख रुपये प्रतिटनाचा भावसुरुवातीपासून ब्लिचिंग पावडर खरेदीसाठी पुरवठादाराला १५ लाख रुपये प्रतिटनाचा भाव दिला जात आहे. त्यानंतर ब्लिचिंग पावडर, अ‍ॅलमच्या दरात वाढ झाल्याने निविदा प्रक्रियेत कोणी सहभागीच होत नाही, अशी सबब देत पाणी पुरवठा विभागाकडून निविदा प्रक्रिया न राबवण्यातील गोंधळावर पांघरुण घातले जात आहे.स्पर्धा होऊ न दिल्याने आता स्पर्धकच नाहीत!गेल्या सहा वर्षांत निविदा प्रक्रिया राबवली असती, तर नवे पुरवठादार सहभागी झाले असते. स्पर्धेमुळे कमी दराने पुरवठा करणारेही पुढे आले असते. मात्र, पाणी पुरवठा विभागाने स्पर्धा होण्यासाठी निविदा प्रक्रियाच राबवली नाही. त्यामुळे इतर कोणीही पुरवठादार जिल्हा परिषदेकडे आले नाहीत. त्याचाच फटका आता नव्या निविदा प्रक्रियेतही बसत आहे. आता सातव्यांदा निविदा बोलावल्या तरी कुणीही सहभाग घ्यायला तयार नसल्याची परिस्थिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद