शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

१५ वर्षांपासून शिक्षक नाहीत, मग डीएडचा डिप्लोमा मिळतो तरी कसा?

By नितिन गव्हाळे | Updated: October 6, 2024 17:23 IST

आठ शिक्षकांचे विषय एकच शिक्षक शिकवतो, महिला अध्यापक विद्यालयातील चित्र

अकोला: शासकीय अध्यापक विद्यालयातून पिढ्या घडविणारे शिक्षक तयार होतात. परंतु याच अध्यापक विद्यालयाची परिस्थिती विदारक झाली असेल तर काय म्हणावे? गत १५ वर्षांपासून येथील शासकीय महिला अध्यापक विद्यालयात शिक्षकच नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. केवळ एकच शिक्षक आठ शिक्षकांच्या विषय शिकवित असल्याचेही समोर आले आहे. शिक्षकांविना सुरू असलेली महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची एकमेव शाळा....असाच उल्लेख याठिकाणी करावा लागत आहे. अशी विदारक परिस्थिती डीएड शिक्षणाची झाली आहे.

अकोला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने शिक्षण उपसंचालक अमरावती व इतर वरिष्ठ कार्यालयांना शिक्षक मिळण्याबाबत अनेकवेळा पत्रव्यवहार केला. मात्र जवळपास १५ वर्षांपासून येथे शिक्षक नसतानाही विद्यार्थ्यांना डीएडचा डिप्लोमा कसा दिला जातोय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्यास्थितीत विद्यालयात प्रथम वर्षाला १४ तर द्वितीय वर्षाला १० विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. शिक्षक नसलेल्या अध्यापक विद्यालयात डिप्लोमा घेत असल्याची खंत येथील विद्यार्थिनी बोलून दाखवतात. दोन वर्षांत एकही प्रात्यक्षिक झाले नाही. ना कुठल्या शाळेत गेले, ना मुलांना शिकवले. तरीही डिप्लोमा मिळाला. अशी एकंदरीत अकोल्यातील शासकीय महिला अध्यापक विद्यालयातील परिस्थिती आहे. शिक्षणाप्रती शासनाची किती ही उदासीनता आहे. हे यातून अधाेरेखित होत आहे. शासकीय महिला अध्यापक विद्यालयात एक मुख्याध्यापक, ८ शिक्षक, २ कनिष्ठ लिपिक, ५ शिपाई, १ चौकीदार अशा एकूण १७ पदांची आवश्यकता आहे, मात्र या अध्यापक विद्यालयात लिपिक, शिपाई आणि चौकीदार ही पदे भरण्यात आली आहेत, तर मुख्याध्याक व शिक्षकांची १२ पदे रिक्त आहेत.पूर्ण विषय शिकवणारा शिक्षकअकोला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने अध्यापक विद्यालयात तात्पुरत्या स्वरुपात व्याख्यात्याची नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे, हा एकच शिक्षक प्रथम आणि द्वितीय वर्षाला शिकवतो. आठ शिक्षकांचे काम एकच व्यक्ती करत असल्याने, राज्य शासन शिक्षणाला किती महत्त्व देत आहे, हे दिसून येते.आम्हाला शिकायचे आहे, मात्र....अध्यापक विद्यालयातील विद्यार्थिनींनी, आम्हाला शिकवायला शिक्षक नसल्याची खंत व्यक्त केली. या ठिकाणी लवकर शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती केली. आम्हाला शिकायचे आहे. मात्र येथे एकही शिक्षक नाही.

टॅग्स :Teacherशिक्षकAkolaअकोला