शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 13:40 IST

अकोला:  अकोला शहराच्या विकासासाठी शासनाकडून मोठया प्रमाणात निधी मिळाला आहे, त्यातून अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत, यापुढेही विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी  ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देसिंधी कॅम्प परिसरातील विविध विकास कामांचे भूमीपूजन पालकमंत्री यांच्या हस्ते झाले. लवकरच सुपरस्पेशालीटी हॉस्पिटलचे काम पूर्ण होणार.

अकोला:  अकोला शहराच्या विकासासाठी शासनाकडून मोठया प्रमाणात निधी मिळाला आहे, त्यातून अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत, यापुढेही विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी  ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिली.

अकोला महानगर पालिका हददीतील मुलभूत सोयी, सुविधे अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, क्राँक्रीटीकरण व नाला बांधकामासह सुधारणाबाबतच्या कामांचे भूमीपूजन आज पालकमंत्री यांच्या हस्ते झाले, या निमित्त सिंधी कॅम्प परिसरातील हिराबाई प्लॉट वाकींग ट्रॅक  येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सिंधी कॅम्प परिसरातील विविध विकास कामांचे भूमीपूजन पालकमंत्री यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक हरीषभाई अलीमचंदानी, महानगर पालिकेचे आयुक्त जितेंद्र वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथीलेष चव्हाण, कन्हैयालालजी रंगवानी, भारुमलजी मुलाणी, किशनचंद धनवाणी, अशोक ओळंबे, दिपक माई, नंदकुमार अलीमचंदाणी, संतोष अग्रवाल आदिंसह परिसरातील नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.

विविध विकास कामांच्या माध्यमातून अकोला शहराचा चेहरामोहरा बदलत आहे, येत्या काळातही अनेक विकासाची कामे केली जाणार आहेत, असे सांगून पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले की, मागील काही वर्षांत शहराच्या विकासासाठी शासनाकडून मोठया प्रमाणात निधी प्राप्त झाला आहे. यातून अनेक विकासाची कामे मार्गी लागली आहेत. लवकरच सुपरस्पेशालीटी हॉस्पिटलचे काम पूर्ण होणार असून त्यामुळे गरीब रुग्णांना उपचाराच्या उत्तम सुविधा मिळणार आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील महत्त्वाच्या 14 रुग्णालयांत जिल्हयातील रुग्णांना उपचाराची सुविधा मिळावी याकरीता सदर रुग्णालयात नाव नोंदणी सुलभपणे करता यावी यासाठी लवकरच येथील शासकीय वैदकीय महाविदयालयात सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्नही तातडीने मार्गी लावल्या जाणार आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयात 500 बेडची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. नेकलेस रोडचे कामही मार्गी लावले जाणार आहे. अमरावती प्रमाणे अकोल्यातही व्यापाऱ्यांसाठी मोठे मार्केट उपलब्ध करुन दिले जाणार आहे. सिंधी बांधवांचे प्रश्न  सोडविण्यासाठी शासन कटीबध्द असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की,  विविध विकास कामांच्या माध्यमातून अकोल्याचा सर्वागिण विकास केला जाणार आहे.

आमदार गोपीकिशन बाजोरिया म्हणाले की, अकोल्याच्या विकासासाठी पालकमंत्री यांच्या प्रयत्नांमुळे मोठया प्रमाणात निधी मिळत आहे. त्यामुळे शहराचा झपाटयाने विकास होताना दिसत आहे. सिंधी बांधवांच्या विविध  प्रश्नांबरोबरच लवकरच करवाढीचा प्रश्नही मार्गी लावल्या जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथीलेष चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Akolaअकोलाguardian ministerपालक मंत्री