शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

‘जीएमसी’त मृतदेह आढळल्यास कुणी जबाबदारी घेईना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 12:33 IST

अकोला: सर्वोपचार रुग्णालयात अनेकदा अनोळखी मृतदेह आढळतात; पण त्या मृतदेहाची माहिती पोलिसांना देणे आणि शवविच्छेदनासाठी पाठविण्याची जबाबदारी कोणीच घेत नसल्याचे वास्तव आहे.

अकोला: सर्वोपचार रुग्णालयात अनेकदा अनोळखी मृतदेह आढळतात; पण त्या मृतदेहाची माहिती पोलिसांना देणे आणि शवविच्छेदनासाठी पाठविण्याची जबाबदारी कोणीच घेत नसल्याचे वास्तव आहे. या मुद्यावरून नेहमीच वैद्यकीय अधिकारी अन् शासकीय सोशल वर्कर्समध्ये वाद होत असल्याने येथे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांच्या मदतीसाठी सोशल वर्कर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत सर्वोपचार रुग्णालयात सहा सोशल वर्कर्स कार्यरत आहेत. सोशल वर्कर्सच्या माध्यमातून रुग्णांना आवश्यक माहिती पुरविण्यासह त्यांना विविध सामाजिक उपक्रमातून आर्थिक मदत पुरवणे अपेक्षित आहे; मात्र त्यांच्यावर इतर प्रशासकीय कामांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अशातच सर्वोपचार रुग्णालय परिसरात अनोळखी मृतदेह आढळल्यास ब्रॉड बाय म्हणून शासकीय सोशल वर्कर्सची जबाबदारी असल्याचे सांगण्यात येते; परंतु शासकीय सोशल वर्कर्सच्या मते घटनास्थळी उपस्थिती नसताना त्यांना ब्रॉड बाय म्हणून पुढे करणे अयोग्य आहे. अशा परिस्थितीत ही जबाबदारी कोणी स्वीकारावी या बाबत गोंधळाची स्थिती आहे. याचा प्रत्यय तीन दिवसांपूर्वी सर्वोपचार रुग्णालयात अनुभवायला मिळाला. येथील सध्याची परिस्थिती पाहता सर्वत्र गोंधळाची स्थिती असून, सोशल वर्कर्सची नेमकी जबाबदारी काय, येथे आढळणाऱ्या अनोळखी मृतदेह आढळल्यास ब्रॉड बाय म्हणून कोणाचे नाव टाकावे, याचे चिंतन करण्याची गरज आहे.जबाबदारी कोणाची?जीएमसी परिसरात अनोळखी मृतदेह आढळल्यास ब्रॉड बाय कोणाला करावे यावरून नेहमीच गोंधळ असतो. अशा परिस्थितीत ज्या व्यक्तीने ही माहिती कळवली त्यालाच ब्रॉड बाय करणे अपेक्षित असल्याचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी ‘लोकमत’सोबत बोलताना सांगितले.तीन दिवसांपूर्वी जीएमसी परिसरात अनोळखी मृतदेह आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्वोपचार रुग्णालयात पोहोचलो; पण तोपर्यंत मृतदेह अपघात कक्षात हलविण्यात आले होते. नेमका प्रकार काय, हे माहिती नसल्याने ब्रॉड बाय म्हणून नाव देणे योग्य नव्हते. यापूर्वीदेखील माझ्या माघारीच माझे नाव ब्रॉड बाय म्हणून अशा प्रकरणात टाकण्यात आले होते. त्यासाठी अधिष्ठातांना निवेदनही दिले होते.- मंगेश ताले, सोशल वर्कर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोलाअनोळखी मृतदेहाच्या बाबतीत ज्या व्यक्तीने माहिती दिली त्यालाच ब्रॉड बाय करणे अपेक्षित आहे. शिवाय, सोईसाठी सोशल वर्कर्ससाठी स्वतंत्र दालन निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू आहे.- डॉ. कुसुमारकर घोरपडे, अधिष्ठाता, जीएमसी

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय