शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यात एकाही नवजात शिशूला नाही कोरोनाची लागण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 10:52 IST

Akola, New born baby not enfected corona नवजात शिशूला कोरोनापासून दूर ठेवण्यात वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोठे यश मिळाले आहे.

ठळक मुद्दे संसर्ग टाळण्यासाठी डॉक्टरच घेताहेत विशेष काळजी कुटुंबीयांनाही करताहेत समुपदेशन

- प्रवीण खेते

अकोला: कोरोनाबाधिताच्या जवळून संपर्कात येणाऱ्यास संसर्गाचा सर्वाधिक धोका असतो; पण डॉक्टरांच्या विशेष खबरदारीमुळे मागील सहा महिन्यात जिल्ह्यातील एकाही नवजात शिशूला कोरोनाची लागण झाली नाही. नवजात शिशूला कोरोनापासून दूर ठेवण्यात वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोठे यश मिळाले आहे.

कोरोनाचा झपाट्याने होणारा फैलाव पाहता सर्वांमध्येच भीती अन् नैराश्याचे वातावरण आहे. मागील सहा महिन्यात जिल्ह्यात चिमुकल्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच कोरोनाची लागण झाली असून, कोरोनाचा संसर्ग एकापासून अनेकांपर्यंत झपाट्याने पसरत आहे; पण याही परिस्थितीत दिलासादायक बाब म्हणजे गत सहा महिन्यात एकाही नवजात बालकाला कोरोनाची लागण झाली नाही. यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विशेष खबरदारी घेत नवजात शिशूंना कोरोनाच्या संसर्गापासून दूर ठेवले आहे. अकोलेकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे. डॉक्टर स्वत: विशेष खबरदारी घेत असून, नवजात शिशूंच्या कुटुंबीयांनादेखील आवश्यक समुपदेशन केले जाते.

 

अशी घेतली जात आहे खबरदारी

 

  • आई स्वत:च योग्य खबरदारी घेत असेल, तर बाळाला तिच्याकडे सोपविण्यात येते;
  • मात्र आईकडून तशी खबरदारी घेण्यात येत नसल्यास स्तनपानासाठी मिल्क बँकेचा आधार घेतला जात आहे.
  • शिशूची प्रकृती चांगली असल्यास त्याला नातेवाइकांकडे सोपविले जाते;
  • परंतु प्रकृती ठीक नसल्यास शिशूला बेबी केअर युनिटमध्ये ठेवण्यात येते.
  • नातेवाइकांना केले जाते योग्य समुपदेशन

 

डॉक्टरांचे हास्य लपलेय मास्कमागे

बाळाचा जन्म होताच डॉक्टरांचा हासरा चेहरा बाळासमोर असतो; पण कोरोनामुळे गेली सहा महिने डॉक्टरांचे हास्य मास्कमागे लपल्याची खंत जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल यांनी व्यक्त केली आहे.

कोरोनाबाधित गर्भवतीसाठी जीएमसी राखीव ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी गर्भवतींसह जन्माला येणाऱ्या शिशूंची विशेष काळजी घेतली जाते. त्यामुळेच अद्याप तरी एकाही नवजात शिशूला कोरोनाची लागण झाली नाही.

- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याLady Harding Hospitalलेडी हार्डिंग रुग्णालयAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय