शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

ओलावा नाही; हरभरा पेरणी खोळंबली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 12:50 IST

अकोला : पावसातील खंडामुळे जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने, जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात रब्बी हरभरा पेरणी खोळंबली असून, पेरणीची वेळ निघून गेल्याने अनेक गावांत रब्बी हंगामातील हरभरा पेरणीचे क्षेत्र रिकामे पडले आहे.

- संतोष येलकरअकोला : पावसातील खंडामुळे जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने, जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात रब्बी हरभरा पेरणी खोळंबली असून, पेरणीची वेळ निघून गेल्याने अनेक गावांत रब्बी हंगामातील हरभरा पेरणीचे क्षेत्र रिकामे पडले आहे. पेरणीअभावी हरभरा पिकाचे उत्पादन बुडाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.पावसातील खंड, जमिनीतील आर्द्रतेचे (ओलावा) कमी प्रमाण व त्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट झाल्याने, जिल्ह्यातील पाच तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. सोयाबीनचे पीक काढल्यानंतर शेतकऱ्यांनी रब्बी हरभरा पेरणीची तयारी सुरू केली; मात्र जमिनीत पेरणीयोग्य ओलावा नसल्याने, अकोला तालुक्यातील अनेक गावांत रब्बी हरभरा पेरणी खोळंबली असून, अशीच परिस्थिती जिल्ह्यात खारपाणपट्ट्यातील इतर गावांमध्येही आहे. जमिनीत ओलावा नाही आणि सिंचनासाठी पाणी नसल्याने हरभरा पेरणी करण्यात आली नसल्याने हरभरा पेरणीचे क्षेत्र रिकामे पडले आहे. पेरणीची वेळ निघून गेली; मात्र अद्याप रब्बी हरभरा पेरणी झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांत हरभरा पिकाचे उत्पादन बुडाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.पेरणीअभावी ‘या’ गावांत रिकामे पडले हरभºयाचे क्षेत्र!जमिनीत पेरणीयोग्य ओलावा नसल्याने, अकोला तालुक्यातील रामगाव, अन्वी मिर्झापूर, दहीगाव गावंडे, बहिरखेड, मजलापूर, धोतर्डी, बोरगाव मंजू, गोंदापूर, मुजरे मोहंमदपूर, कौलखेड जहागीर, बहादलपूर, पळसो बढे इत्यादी गावांच्या शिवारात रब्बी हंगामातील हरभरा पेरणी अद्याप करण्यात आली नाही. पेरणीअभावी या गावांमध्ये हरभºयाचे क्षेत्र रिकामे पडले आहे. पाण्याची सुविधा उपलब्ध नसलेल्या जिल्ह्यातील इतर गावांमध्येही हीच परिस्थिती आहे.प्रकल्पाचे पाणी सोडले; शेतापर्यंत पोहोचलेच नाही!रब्बी हंगामातील सिंचनासाठी काटेपूर्णा प्रकल्पातून गत आठवड्यात पाणी सोडण्यात आले; परंतु लाभ क्षेत्रातील रामगाव, अन्वी मिर्झापूर, दहीगाव गावंडे, बहिरखेड, मजलापूर, धोतर्डी, बोरगाव मंजू, गोंदापूर, मुजरे मोहंमदपूर, कौलखेड जहागीर, बहादलपूर यासह इतर गावांतील शेतशिवारापर्यंत ९ नोव्हेंबरपर्यंत प्रकल्पाचे पाणी पोहोचलेच नाही....तर हरभरा पेरणी साधली असती!रब्बी हंगामासाठी आठ दिवसांपूर्वी काटेपूर्णा प्रकल्पातून लाभ क्षेत्राकरिता पाणी सोडण्यात आले; परंतु सिंचनासाठी काटेपूर्णा प्रकल्पातून १५ दिवसांपूर्वी पाणी सोडले असते, तर जमिनीत ओलावा कमी असल्याने आणि पाण्याअभावी खोळंबलेली रब्बी हरभरा पेरणी साधली असती, असे शेतकºयांचे म्हणणे आहे.तुरीचे पीकही अडचणीत!जमिनीत ओलावा नसल्याने तुरीचे पीकही अडचणीत सापडले आहे. काटेपूर्णा प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी तातडीने शेतापर्यंत पोहोचल्यास तुरीच्या पिकासाठी पोषक ठरणार असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.सोयाबीनचे पीक काढल्यानंतर रब्बी हरभरा पेरणीची तयारी केली; मात्र जमिनीत ओलावा नसल्याने, रामगावसह परिसरातील अनेक गावांत हरभरा पेरणी करण्यात आली नाही. पेरणीची वेळ निघून गेल्याने हरभºयाचे उत्पादन बुडाले आहे. काटेपूर्णा प्रकल्पातून गत आठवड्यात सोडण्यात आलेले पाणी अद्याप शेतापर्यंत पोहोचले नाही. १५ दिवसांआधी प्रकल्पाचे पाणी मिळाले असते, तर हरभरा पेरणी साधली असती.-शिवाजीराव भरणे,शेतकरी, रामगाव, ता. अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी