शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Sting Operation : लॉगबुकचा पत्ताच नाही; सरपंचाला तोंडी दिली जाते माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 12:24 IST

खेट्री: पाणीटंचाईच्या पृष्ठभूमीवर पातूर तालुक्यातील उमरा, सुकळी आणि पिंपळखुटा या गावांमध्ये प्रत्येकी एक टँकरची व्यवस्था करण्यात आली; परंतु लोकसंख्येने मोठ्या असलेल्या या गावांची तहान एका टँकरवर भागत नाही.

- नासीर शेखखेट्री (ता. पातूर): पाणीटंचाईच्या पृष्ठभूमीवर पातूर तालुक्यातील उमरा, सुकळी आणि पिंपळखुटा या गावांमध्ये प्रत्येकी एक टँकरची व्यवस्था करण्यात आली; परंतु लोकसंख्येने मोठ्या असलेल्या या गावांची तहान एका टँकरवर भागत नाही. तसेच या गावांमध्ये येणाऱ्या टँकरचालकाकडे खेपांची नोंद करण्यासाठी असलेले लॉगबुकच उपलब्ध नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ने १२ मे रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनद्वारे समोर आले आहे. त्यामुळे या ठिकाणी पाण्याच्या खेपांची अनियमितता होण्याची शक्यता नाकारता येत नाहीपातूर पंचायत समितीकडून तालुक्यातील उमरा, सुकळी, पिंपळखुटा या तीन गावांची टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची निवड करण्यात आली आहे. या तिन्ही गावांना २४ हजार लीटरच्या प्रत्येकी १ टँकरद्वारे ९ मेपासून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पिंपळखुटा गावात पहिल्याच दिवशी टँकर रस्ता अरुंद असल्याचे कारण देत चालकाने टँकर परत नेला. शेतातील अधिग्रहण केलेल्या विहिरीवरून टँकरद्वारे पाणी आणून गावातील विहिरींमध्ये टाकून गावाला पाणीपुरवठा केला जात आहे; परंतु मोठ्या लोकसंख्येला हा पाणी पुरवठा अपुरा पडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या टँकरवर अधिकाºयाऐवजी ग्रामपंचायत शिपाई नियंत्रण ठेवत असल्याचे दोन्ही गावांमध्ये आढळून आले. पाणी मिळाल्याची नोंद लॉगबुकमध्ये करणे गरजेचे आहे; मात्र या ठिकाणी लॉगबुकच उपलब्ध नसल्याचे दिसून आले. विहिरीमध्ये पाणी टाकण्याची माहिती सरपंचाला तोंडी दिली जाते, असे टँकरचालकांनी सांगितले. दोन्ही टँकरमध्ये जीपीएस यंत्रणा कार्यान्वित असल्याचेही दिसून आले; परंतु त्यावर नियंत्रण कुणाचे, हे चालकालाही ठाऊक नव्हते.ब्लिचिंग पावडरचा वापर नाहीटँकरद्वारे आणलेले पाणी ज्या विहिरींमध्ये टाकल्या जाते, त्या विहिरी स्वच्छ दिसून आल्या; परंतु या ठिकाणी ब्लिचिंग पावडरचा वापर केला जात नसल्याचे वास्तव आहे.टँकरची एकच फेरीउमरा व सुकळी या गावांमध्ये दिवसातून एक वेळ टँकर येतो. टँकरमुळे पाणीटंचाईपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तर टँकरच्या दोना फेºया केल्यास पाणीटंचाईची समस्या दूर होऊ शकते, अशी मागणी होत आहे.विद्युत पुरवठा खंडित असल्याचा फटकापरिसरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे पाणी भरण्यासाठी टँकर तासन्तास ताटकळत उभा करावा लागत असल्यामुळे पाणीपुरवठा करण्यास विलंब होत आहे. याकडे वीज वितरण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

टँकरची एकच फेरी होत असल्यामुळे पाणी पुरवठा अपुरा होत आहे. टँकरच्या दोन फेºया केल्यास पाणीटंचाई दूर होऊ शकते. - नारायण रामदास हरमकार, ग्रामस्थ, उमरा. गावाला एक टँकर मिळाला असून, काही प्रमाणात पाणीटंचाई दूर झाली आहे. दोन टँकरने पाणी पुरवठा केल्यास पूर्ण पाणीटंचाई दूर होण्यास मदत होईल.काशीराम हिवराळे मा. सरपंच. पिंपळखुटा येथे पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर आला होता; परंतु रस्ता अरुंद असल्यामुळे चालकांनी टँकर परत नेला. पंचायत समितीकडून दुसरा टँकर आज मिळणार आहे.- सुनीता रवींद्र शेलार, सरपंच, पिंपळखुटा.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाईPaturपातूर