शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सुविधांचा पत्ता नाही; मनपा हद्दवाढीतील ४६ हजार मालमत्ताधारकांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 13:25 IST

अकोला: महानगरपालिका हद्दवाढीच्या भागात मूलभूत सुविधा उपलब्ध नसताना, हद्दवाढीच्या क्षेत्रात समाविष्ट ४६ हजार मालमत्ताधारकांना कर आकारणीच्या नोटीस महानगरपालिका प्रशासनामार्फत बजावण्यात आल्या असून, कर आकारणीसंदर्भात १ जुलैपर्यंत आक्षेप मागविण्यात आले आहेत.गत ३० आॅगस्ट २०१६ रोजी शासनाच्या अधिसूचनेनुसार अकोला महानरपालिकेची हद्दवाढ करण्यात आली. हद्दवाढीत शहरानजीकची २४ गावे समाविष्ट करण्यात आली. महानगरपालिकेची हद्दवाढ ...

ठळक मुद्देहद्दवाढीत समाविष्ट २४ गावांच्या क्षेत्रातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा, रस्ते, पथदिवे, नाल्या, स्वच्छता इत्यादी मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या नाही. ४६ हजार मालमत्ताधारकांना नवीन कर आकारणीच्या नोटीस महानगरपालिका प्रशासनामार्फत ११ जून रोजी बजावण्यात आल्या आहेत. नोटीस मिळाल्यापासून २१ दिवसात म्हणजेच १ जुलैपर्यंत मालमत्ताधारकांकडून कर आकारणीसंदर्भात आक्षेप मागविण्यात आले आहेत.

अकोला: महानगरपालिका हद्दवाढीच्या भागात मूलभूत सुविधा उपलब्ध नसताना, हद्दवाढीच्या क्षेत्रात समाविष्ट ४६ हजार मालमत्ताधारकांना कर आकारणीच्या नोटीस महानगरपालिका प्रशासनामार्फत बजावण्यात आल्या असून, कर आकारणीसंदर्भात १ जुलैपर्यंत आक्षेप मागविण्यात आले आहेत.गत ३० आॅगस्ट २०१६ रोजी शासनाच्या अधिसूचनेनुसार अकोला महानरपालिकेची हद्दवाढ करण्यात आली. हद्दवाढीत शहरानजीकची २४ गावे समाविष्ट करण्यात आली. महानगरपालिकेची हद्दवाढ होऊन दीड वर्षाचा कालावधी उलटून गेला; मात्र हद्दवाढीत समाविष्ट २४ गावांच्या क्षेत्रातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा, रस्ते, पथदिवे, नाल्या, स्वच्छता इत्यादी मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या नाही. मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्या तरी, हद्दवाढीच्या क्षेत्रातील ४६ हजार मालमत्ताधारकांना नवीन कर आकारणीच्या नोटीस महानगरपालिका प्रशासनामार्फत ११ जून रोजी बजावण्यात आल्या आहेत. नोटीस मिळाल्यापासून २१ दिवसात म्हणजेच १ जुलैपर्यंत मालमत्ताधारकांकडून कर आकारणीसंदर्भात आक्षेप मागविण्यात आले आहेत.कर आकारणीचे असे आहे स्वरूप!हद्दवाढीतील मालमत्ताधारकांना बजावलेल्या नवीन कर आकारणीच्या नोटीसनुसार, मालमत्ताधारकांना सामान्य कर, रस्ता कर, अग्निशमन कर, शिक्षण कर, पाणी कर, विशेष स्वच्छता कर, वृक्ष कर, रोजगार हमी कर आणि शिक्षण उपकर इत्यादी प्रकारची कर आकारणी करण्यात आली आहे.हद्दवाढीच्या भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरच या भागातील मालमत्ताधारकांना नवीन कर आकारणी केली पाहिजे. मूलभूत सुविधा उपलब्ध नसताना, मालमत्ताधारकांना नवीन कर आकारणीच्या नोटीस देणे योग्य नाही.- अ‍ॅड. धनश्री देवगटनेता, मनपा, भारिप-बमसं.मनपा हद्दवाढीच्या क्षेत्रात मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यात येत असून, १०० कोटींची कामे मंजूर करण्यात आली आहेत. हद्दवाढीच्या क्षेत्रातील ४६ हजार मालमत्ताधारकांना कर आकारणीच्या नोटीस बजावण्यात आल्या असून, नोटीस मिळाल्यापासून २१ दिवसात आक्षेप मागविण्यात आले आहेत.-जितेंद्र वाघआयुक्त, महानगरापलिका.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका