शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीई’ प्रवेशासाठी शाळांमध्ये ‘नो-एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 12:22 IST

शहरातील प्रमुख ८ ते १० शाळांनी अल्पसंख्यांक दर्जाच्या नावाखाली सुटका करून घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आरटीई अंतर्गत पात्र बालकांना इयत्ता पहिल्या वर्गात मोफत प्रवेश देण्यासाठी जिल्ह्यातील १९३ खासगी शाळांची नोंंदणी केली असली तरी त्यामध्ये पालकांना प्रवेशाची अपेक्षा असलेल्या शहरातील प्रमुख ८ ते १० शाळांनी अल्पसंख्यांक दर्जाच्या नावाखाली सुटका करून घेतली आहे. त्यामुळे पालकांचा हिरमोड झाला आहे.शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (राइट टु एज्युकेशन) मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेश देणे खासगी शाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुषंगाने २०२०-२१ या शैक्षणिक सत्रासाठी मोफत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात २१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी यादरम्यान शाळांना नोंदणी करावी लागणार होती. वाढीव मुदतीनंतर ९ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील १९३ शाळांची नोंदणी झाली. विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत प्रवेश देण्यासाठी पालकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या शाळांनी नोंदणीच केली नसल्याची माहिती आहे.या शाळांनी धार्मिक अल्पसंख्याक संस्थांचा दर्जा प्राप्त केला. त्यामुळे बालकांना मोफत प्रवेश प्रक्रियेतून त्यांना सूट मिळाल्याचे म्हणणे आहे; मात्र, शहरातील पालकांना या शाळांमध्ये प्रवेश मिळण्याची अपेक्षा होती. त्या शाळा प्रवेश अर्ज भरताना दिसतच नाहीत. त्यातच रहिवासी पत्ता परिसरातील काही शाळांच स्क्रीनवर येतात. त्यापैकी पर्याय निवडून पुढे जाण्याची वेळ पालकांवर आली आहे.

नामांकीत शाळांची शक्कलआरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी २,२५८ जागा राखीव आहेत. त्यासाठी नोंदणी झालेल्या १९३ शाळांमध्येच प्रवेश दिला जाणार आहे. शहरातील काही नामांकित शाळांनी त्यामध्ये नोंदणीच न केल्याने त्या शाळांमध्ये आरटीई प्रवेशासाठी नो-एन्ट्री आहे. त्यामध्ये होलीक्रॉस कॉन्व्हेंट प्रायमरी स्कूल, एमराल्ड स्कूल, सेंट अ‍ॅन्स, माउंट कारमेल, नोएल कॉन्व्हेंट यासह इतरही शाळांचा समावेश आहे.

आॅनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू!शाळांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर पालकांना आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी आॅनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी २९ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे. ती वाढण्याची शक्यता आहे; मात्र हव्या त्या शाळा प्रवेश पात्र यादीत नसल्याने अनेक पालकांनी अर्ज भरण्याला फाटा दिला आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाAkolaअकोला