शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पिंजर योजनेत अपहार; कारवाई प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 13:24 IST

नियमित मुख्य कार्यकारी अधिकारी रुजू झाल्यानंतर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात असताना प्रस्तावावर अद्यापही निर्णय झाला नसल्याची माहिती आहे.

अकोला: भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत पेयजल योजनेतील निधी खर्चात अनियमितता केल्याप्रकरणी पिंजर योजनेशी संबंधित जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता, बार्शीटाकळीचे गटविकास अधिकारी, समितीच्या अध्यक्ष, सचिवावर वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कारवाई प्रस्तावित करण्यात आली. नियमित मुख्य कार्यकारी अधिकारी रुजू झाल्यानंतर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात असताना प्रस्तावावर अद्यापही निर्णय झाला नसल्याची माहिती आहे.भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत २००८-०९ मध्ये पिंजर येथे पाणी पुरवठा योजनेचे काम हाती घेण्यात आले. त्याची अंदाजित किंमत २ कोटी ५५ लाख ८४ हजार ४०० रुपये होती. त्यातून योजनेचे काम करण्यात आले; मात्र पाणी पुरवठा बंद पडला. त्याचवेळी आधीच्या निधीतून ६६ लाख ७३ हजार ६५७ रुपये शिल्लक होते. ती रक्कम पिंजर ग्रामपंचायतने २०१५-१६ मध्ये टंचाईच्या कामासाठी खर्च केली. त्यासाठी ५० लाखांच्यावर कामाची किंमत असेल, तर जलसंधारण समिती सभेची मंजुरी आवश्यक आहे. ती न घेताच काम करण्यात आले. प्रशासकीय मंजुरी घेतली नाही. कामाचे ई-टेंडरिंग केले नाही, तसेच कामाची मोजमाप पुस्तिका तयार न करताच कंत्राटदाराला देयकही अदा केले. ही संपूर्ण अनियमितता असल्याने याप्रकरणी तक्रारीवरून चौकशी करण्यात आली. तेल्हाराचे सहायक गटविकास अधिकारी यांनी अहवाल डिसेंबर २०१६ मध्येच सादर केला. त्यातील दोषींवर कारवाई झालेली नाही. अनियमिततेसाठी तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांनाही जबाबदार धरण्यात आले. काम सुरू करण्यापूर्वी शासनाची मंजुरी न घेणे, ई-निविदा न करणे, खासगी उद्भवातून पाणी घेताना शहानिशा न करणे, या मुद्यांचे स्पष्टीकरण त्यांना मागविण्यात आले. त्यानंतर पिंजरच्या ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीने ई-टेंडरिंग न करणे, कामाची मोजमाप पुस्तिका तयार होण्यापूर्वीच लाखो रुपये कंत्राटदाराला देणे, याप्रकरणी समिती अध्यक्ष, सचिवावर वसुलीसह फौजदारी कारवाई प्रस्तावित करण्यात आली. त्या प्रस्तावावर नियमित मुख्य कार्यकारी अधिकारी रुजू झाल्यानंतर निर्णय घेतला जाण्याची शक्यता होती. महिने उलटले तरीही कारवाई होत नसल्याने दोषींना पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू असल्याचे चित्र आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाfraudधोकेबाजी