शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

दोषी संचालकांविरुद्ध अद्याप कारवाई नाही!

By admin | Updated: March 27, 2017 03:06 IST

‘आर्थोपेडिक इम्प्लांट’चा साठा जप्त; राज्यात ४२ ठिकाणांवर छापे.

सचिन राऊतअकोला, दि. २६- 'आर्थोपेडिक इम्प्लांट'ची विनापरवाना निर्मिती करणारे कारखाने आणि विनापरवाना तसेच बेकायदेशीररीत्या खरेदी-विक्री करणार्‍यांवर छापेमारी करीत ७ कोटी ४५ लाख रुपयांचा 'आर्थोपेडिक इम्प्लांट'चा साठा अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केला आहे; मात्र या प्रतिष्ठान आणि कारखान्यांच्या संचालकांवर अद्याप कारवाई झाली नसल्याची माहिती आहे.'आर्थोपेडिक इम्प्लांट' औषधांच्या व्याख्येत येत असल्याने त्याची निर्मिती करताना आणि खरेदी-विक्री करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना बंधनकारक आहे; मात्र महाराष्ट्रात आर्थोपेडिक इम्प्लांटह्णची निर्मिती करणार्‍या कारखान्यांना, खरेदी-विक्री करणार्‍यांना परवानाच नसल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या छापेमारीत उघड झाले आहे. राज्यात तब्बल ४२ ठिकाणांवर छापेमारी केल्यानंतर ७ कोटी ४५ लाख रुपयांचे ह्यआर्थोपेडिक इम्प्लांटह्ण जप्त करण्यात आले; मात्र ज्या कारखान्यांमधून आणि खरेदी-विक्री करणार्‍यांच्या प्रतिष्ठानांमधून साठा जप्त करण्यात आला, त्यांच्यावर अद्याप कारवाई झाली नसल्याचे वास्तव आहे. मानवाच्या शरीरात टाकण्यात येणारी हि ह्यआर्थोपेडिक इम्प्लांटह्ण अन्न व औषध विभागाचे मानांकनास पात्र नाही. ही नियमबाह्य इम्प्लांट शरीरात टाकण्यात आल्याने अनेकांचा जीव धोक्यात सापडल्याचेही वास्तव आहे. त्यामुळे बेकायदेशीर खरेदी-विक्री आणि निर्मिती करणार्‍यांचा साठा जप्त करण्यात आला; मात्र कारवाईला बगल दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.---------------लोकमतचा पाठपुरावाराज्यात विविध ठिकाणी आर्थोपेडिक इम्प्लांटची विनापरवाना खरेदी-विक्री आणि निर्मिती करण्यात येत आहे. हे प्रकरण उघड झाल्यानंतर लोकमतने राज्यभर या प्रकरणाचा पाठपुरावा केला. सात कोटींचा साठाही जप्त करण्यात आला. रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याने संबंधितांवर कठोर कारवाई करण्यासाठी लोकमतने पुढाकार घेतला आहे.---------------रुग्णांसाठी धोकादायककोणत्याही रुग्णाचे हाड मोडल्यानंतर ते हाड पुन्हा जोडण्याठी ह्यआर्थोपेडिक इम्प्लांटह्ण वापरण्यात येते. यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने काही मानके ठरविली आहेत; मात्र परवानाच नसलेल्या कारखान्यातून, काही प्रतिष्ठान आणि थेट डॉक्टर यांच्यातच हा व्यवहार झाल्याने या मानकास अपात्र असलेले ह्यआर्थोपेडिक इम्प्लांटह्ण मानवाच्या शरीरात टाकण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांच्या जिवाशी खेळल्या गेले आहे. हा प्रकार रुग्णांसाठी धोकादायक आहे.