शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दहापैकी नऊ जणांना बायकोचाही मोबाइल नंबर पाठ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 10:13 IST

Nine out of ten do not memories even have a wife's mobile number: अनेकांना आपल्या पत्नीचा नंबर पाठ नव्हता, तर काही पत्नींना आपल्या पतिदेवाचा नंबरही पाठ नसल्याचे लक्षात आले.

अकोला : आधुनिक काळानुसार माणसाच्या दैनंदिन उपयोगातील उपकरणेही बदलली आहेत. याचा परिणाम माणसांच्या स्मरणशक्तीवर झाला. याचा रिॲलिटी चेक ‘लोकमत’ने केला. त्यासाठी काही चाैक आणि काही व्यक्तींशी संपर्क साधला तर अनेकांना आपल्या पत्नीचा नंबर पाठ नव्हता, तर काही पत्नींना आपल्या पतिदेवाचा नंबरही पाठ नसल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे, त्यांच्या मुलांना आपल्या आई-वडिलांचा नंबर पाठ आहे.

मानसोपचार तज्ज्ञांनी या विषयात आपले मत मांडताना नागरिक आपल्या रिकाॅल मेमरीचा वापर करीत नाहीत. यामुळे असा प्रकार घडतो, असे ते म्हणाले. अद्ययावत तंत्रज्ञानाने माणूस हायटेक तर झाला; परंतु तो परावलंबी झाला. त्याचा मोबाइल बंद पडला तर त्याचे सर्व काम थांबून जाते. यासाठी प्रत्येकाने दररोज रिकाॅल मेमरीचा वापर केला पाहिजे. अन्यथा मेमरी असतानाही त्याचा उपयोग होणार नाही.

 

लोकमत @गांधी चौक

अ - एकाला वडिलांचा क्रमांक आठवला; परंतु बायकोचा क्रमांक नाही आठवला.

ब - एकाला स्वतःच्या क्रमांकाव्यतिरिक्त इतर कोणाचेच क्रमांक पाठ नव्हते.

क - एकाला दुकानातील नोकरांचे क्रमांक पाठ होते; मात्र घरातील सदस्यांचे क्रमांक पाठ नव्हते.

ड - आणखी एकाला स्वतःच्या क्रमांकाव्यतिरिक्त इतर कोणाचेच क्रमांक पाठ नव्हते.

ई - एकाला आई-वडिलांचा क्रमांक आठवला; परंतु बायकोचा क्रमांक आठवला नाही.

 

तरुणांपासून वृद्धांपर्यंत सगळे सारखेच!

शहरातील परिसरांमध्ये लोकांना विचारणा केली असता अनेकांना एकमेकांचे वाढदिवस, मोबाइल क्रमांक अशा गोष्टी पाठ नसल्याचे दिसून आले.

वाढदिवसाची तारीख ही सोशल मीडियाद्वारे कळत असल्याचे अनेकांनी सांगितले, तर मोबाइल क्रमांकाविषयी विचारणा केली असता तरुणवर्ग हा पूर्णपणे मोबाइलवरच अवलंबून असल्याचे दिसून आले.

अनेक तरुणांना आपल्या आई-वडिलांच्या मोबाइल क्रमांकाव्यतिरिक्त इतर कोणाचेच मोबाइल क्रमांक पाठ नसल्याचे आढळून आले, तर वृद्ध नागरिकांना पूर्वीप्रमाणे डायरी सांभाळून ठेवण्याची सवय असल्याने त्यांनी काही महत्त्वाचे क्रमांक डायरीमध्ये लिहून ठेवले असल्याचे सांगितले.

बायकांनाही पतिदेवाचा नंबर आठवेना!

मला केवळ पतीचा मोबाइल क्रमांक पाठ आहे तर मुलाच्या मोबाइलचे सुरुवातीचे चार आकडे पाठ आहेत. पुढील आठवत नाहीत. स्वत:चा पाठ आहे.

- एक गृहिणी

मोबाइलमध्ये सर्व काही सेव्ह होत असल्याने आता क्रमांक पाठ करून ठेवण्याचा काळ गेला आहे. त्यामुळे स्वतःचा मोबाइल क्रमांक सोडता इतर कोणाचेच क्रमांक पाठ नाहीत.

- एक गृहिणी

 

पोरांना मात्र आई-बाबांचा नंबर पाठ

 

प्रत्येक पालकाने आपला मुलगा कुठे विसरला तर त्याला घरी परत येता यावे म्हणून कुटुंबीयांनी त्याच्याकडून नंबर पाठ करून घेतला. यामुळे त्याला आई-बाबांचा नंबर मूकपाठ आहे. त्यामुळे तो मोबाइल न घेता नंबर सांगू शकतो.

 

- विहान

 

मला माझे नाव, माझ्या शाळेचे नाव, शिक्षकांचे नाव आणि आई-बाबांचा मोबाइल नंबर पाठ आहे. हातात मोबाइल न घेता मला तो नंबर सांगता येतो. यामुळे कधी नंबर हरविला तर मला विचारले जाते आणि मी सहज नंबर सांगतो.

 

- नूतन

 

मोबाइलच्या अतिवापरामुळे लहान मुलांसोबतच तरुणांमध्येही पेशन्सची कमी झाली आहे. त्यांना सर्वकाही एका क्लिकवर मिळण्याची अपेक्षा असते. त्यामुळे ते कुठलीही गोष्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करीत नाहीत. हा प्रकार टाळण्यासाठी पालकांनी मुलांसोबत वेळ घालविण्याची गरज आहे.

- डॉ. शिल्पा तायडे, मानसोपचार तज्ज्ञ, जीएमसी, अकोला

टॅग्स :AkolaअकोलाMobileमोबाइल