शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला मनपाच्या नऊ कंत्राटी आरोग्य निरीक्षकांना घरचा रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 13:32 IST

अकोला: महापालिकेत ‘आउट सोर्सिंग’च्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीनुसार नियुक्त झालेल्या नऊ आरोग्य निरीक्षकांची शैक्षणिक अर्हता नसल्यामुळे त्यांचा कंत्राट रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी महापालिकेच्या स्थायी समितीत घेण्यात आला.

ठळक मुद्देनऊ आरोग्य निरीक्षकांची शैक्षणिक अर्हता नसल्यामुळे त्यांना पदावरून कमी करण्याचा मुद्दा भाजप नगरसेवक सुनील क्षीरसागर यांनी उपस्थित केला.‘आउट सोर्सिंग’मार्फत मनपात नियुक्त झालेल्या नऊ आरोग्य निरीक्षकांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय सभापती विशाल इंगळे यांनी घेतला. बाळ टाले, अनिल गरड यांनी कं त्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना प्रशासनाने निकषांकडे दुर्लक्ष केल्याचे मत व्यक्त केले.

अकोला: महापालिकेत ‘आउट सोर्सिंग’च्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीनुसार नियुक्त झालेल्या नऊ आरोग्य निरीक्षकांची शैक्षणिक अर्हता नसल्यामुळे त्यांचा कंत्राट रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी महापालिकेच्या स्थायी समितीत घेण्यात आला. तसेच शहराच्या विविध भागातील खुल्या भूखंडांवर ‘ग्रीन झोन’(हरित पट्टे) तयार करण्यासाठी मंजूर निविदाधारकाकडे अनुभव नसल्यामुळे याविषयी पुन्हा निविदा काढण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात मंगळवारी ‘स्थायी’ची सभा पार पडली. यावेळी खासगी कंपनीच्या माध्यमातून मनपात आरोग्य निरीक्षक पदावर नियुक्त झालेल्या कंत्राटी नऊ आरोग्य निरीक्षकांची शैक्षणिक अर्हता नसल्यामुळे त्यांना पदावरून कमी करण्याचा मुद्दा भाजप नगरसेवक सुनील क्षीरसागर यांनी उपस्थित केला. त्यावर बाळ टाले, अनिल गरड यांनी कं त्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना प्रशासनाने निकषांकडे दुर्लक्ष केल्याचे मत व्यक्त केले. शैक्षणिक अर्हता नसताना मनपात कर्मचाºयांची पदभरती होतेच कशी, असा सवाल बाळ टाले यांनी उपस्थित केला. याविषयी प्रशासनाने सादर केलेली टिप्पणी व सभागृहाचे मत लक्षात घेता ‘आउट सोर्सिंग’मार्फत मनपात नियुक्त झालेल्या नऊ आरोग्य निरीक्षकांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय सभापती विशाल इंगळे यांनी घेतला. शहरात हरित पट्टे तयार करण्यासाठी जलप्रदाय विभागाने निविदा प्रकाशित केली असता सर्वात कमी दराची निविदा अनिकेत अ‍ॅग्रो सर्व्हिसेस पुणे यांची मंजूर करण्यात आली होती; परंतु संबंधित एजन्सीकडे कामाचा अनुभव नसल्याचा मुद्दा भाजपचे सुनील क्षीरसागर यांनी मांडला. त्याला बाळ टाले, अनिल गरड यांनी दुजोरा देत निविदा रद्द करण्याची मागणी लावून धरली. अखेर हरित पट्ट्यांसाठी फेरनिविदा काढण्याचे निर्देश सभापती विशाल इंगळे यांनी दिले.हायड्रंटमधील गाळ कधी काढणार?पाणी टंचाईमुळे शहरातील हायड्रंटचा वापर अत्यावश्यक झाला आहे; परंतु त्यामध्ये गाळ असल्याने तो कधी काढणार, असा सवाल भारिप-बमसंच्या गटनेत्या अ‍ॅड. धनश्री देव यांनी उपस्थित केला तसेच टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी केली. त्यावर दोन दिवसांत हायड्रंटमधील गाळ काढणार असल्याचे जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका