महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी नऊ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:37 PM2019-09-24T12:37:40+5:302019-09-24T12:37:44+5:30

सार्वजनिक आरोग्य विभागाने २३ सप्टेंबर रोजी नऊ कोटी रुपये निधी वितरीत करण्याचा निर्णय घेतला.

Nine crore funds forMahatma Jyotiba Phule Jan Arogya yojana | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी नऊ कोटींचा निधी

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी नऊ कोटींचा निधी

Next

अकोला: सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी शासनाकडून विविध योजना व निधी वितरीत केला जातो. यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी या उद्देशातून सार्वजनिक आरोग्य विभागाने २३ सप्टेंबर रोजी नऊ कोटी रुपये निधी वितरीत करण्याचा निर्णय घेतला. या निधीचा पात्र लाभार्थ्यांना उपयोग होण्यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत अंमलबजावणी केली जाणार आहे.
श्रीमंत असो वा गरीब, अचानकनपणे उद्भवणाऱ्या आजारांचा सर्वांनाचा सामना करावा लागतो. अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची राहत असल्यामुळे त्यांच्याकडे उपचारासाठी पैशांची कमतरता भासते. अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोफत किंवा अत्यल्प दरात आरोग्य सेवेचा लाभ मिळावा,याकरीता शासनाकडून विविध आरोग्य योजना राबविल्या जातात. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील चौदा जिल्ह्यांत दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जात आहे. यामध्ये तब्बल अकराशे आजारांवरील उपचारांचा समावेश आहे. राज्य शासनाने चालू आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या १५ कोटींमधून नऊ कोटींचा निधी वितरीत करण्यासाठी मंजूरी दिली आहे.

प्रतिवर्ष दोन लाखांचे विमा संरक्षण
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत विविध प्रकारच्या तब्बल अकराशे आजारांवर उपचार करण्याचा समावेश आहे. यामध्ये प्रति वर्ष प्रति कुटुंबासाठी दोन लाखांचा विमा संरक्षण काढला जातो. मुत्रपिंड रोपणासाठी ही मर्यादा प्रतिकुटुंब तीन लाख रुपये आहे.

या चौदा जिल्ह्यांत योजनेचा लाभ
सदर योजनेचा लाभ अकोला, अमरावती, बुलडाणा,वाशिम, यवतमाळ, औरंगाबाद,बिड, जालना, उस्मानाबाद, नांदेड,लातूर,हिंगोली,परभणी तसेच वर्धा जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांसाठी आहे. दरम्यान, महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेत पत्रकारांचाही समावेश करण्यात आला आहे.

 

Web Title: Nine crore funds forMahatma Jyotiba Phule Jan Arogya yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.