शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीची संचारबंदी फक्त कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 11:57 IST

पोलिसांच्या कारवाईचाही धाक संपला असल्याने रात्री १२ वाजेपर्यंत रस्त्यावरची गर्दी कायम असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने टिपले आहे.

अकोला : ‘अनलॉक’च्या या प्रक्रियेत कोरोनाही ‘अनलॉक’ झाला असून, अकोलेकरांंच्या बेफिकिरीमुळे या अत्यंत घातक विषाणूचा संसर्ग होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ आॅगस्ट रोजी लॉकडाऊन संदर्भात आदेश काढताना १ ते ३० सप्टेंबरपर्यंत संध्याकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदी घोषित केली आहे; मात्र अकोल्यातील कोणत्याही कोपºयात या संचारबंदीच्या अंमलबजावणीचे चित्र नाही. पोलिसांच्या कारवाईचाही धाक संपला असल्याने रात्री १२ वाजेपर्यंत रस्त्यावरची गर्दी कायम असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने टिपले आहे.‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत अनलॉक-४ सुरू झाला असून, यामध्ये अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. आतापर्यंत बंद असलेली एसटीची प्रवासी वाहतूक सेवाही बहाल करण्यात आली असून, आंतरजिल्हा प्रवासासाठी आवश्यक असलेली ई-पासची अट तसेच रविवारचे लॉकडाऊनही रद्द करण्यात आले आहे. या विविध सवलती दिल्या जात असताना नागरिकांनी मास्क परिधान करणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे यासारख्या कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आणि किमान संध्याकाळी सात ते सकाळी सातपर्यंत संचारबंदीचे पालन करून संसर्ग टाळणे अपेक्षित आहे; परंतु अनलॉकच्या प्रक्रियेत नागरिक अधिक बेफिकीर झाल्याचे चित्र अकोला शहरासह ग्रामीण भागात दिसून येत आहे. अकोल्यातील सिंधी कॅम्प मार्गावर तर संध्याकाळी सातनंतर दुकानेही सुरू असतात अन् नागरिकांची वर्दळही रात्री १२ पर्यंत असते. जठारपेठ, टॉवर चौक, गांधी रोड, तुकाराम चौक, इन्कमटॅक्स चौक, जुने शहर अशा महत्त्वाच्या चौकातही रात्री वर्दळ असते. कलम १४४ च्या कारवाईचा धाकही संपला!कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकारी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ अन्वये संध्याकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदीचा आदेश काढलेला आहे. गेल्या १० दिवसात या आदेशाचे उल्लंघन झाले म्हणून एकाही व्यक्तीवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे कारवाईचा धाकच नसल्याने नागरिकांकडून नियमांची पायमल्ली होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला