शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांचा बुधवारपासून बेमुदत ‘कामबंद’चा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 18:47 IST

अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी तसेच पुनर्नियुक्ती प्रक्रियेतील बदलाचा निषेध करण्यासाठी बुधवार, ११ एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देसमान काम-समान वेतन व कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी हे कर्मचारी आंदोलन करीत आहेत.कंत्राटी कर्मचाऱ्यांना यापुढे सहा महिन्यांची पुनर्नियुक्ती देण्याच्या सूचनाही अतिरिक्त संचालकांनी दिल्या आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाने येत्या ११ एप्रिलपासून बेमुदत काम बंदचा इशारा दिला आहे.

अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी तसेच पुनर्नियुक्ती प्रक्रियेतील बदलाचा निषेध करण्यासाठी बुधवार, ११ एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी/कर्मचारी महासंघाने राज्यभरात आंदोलनाची हाक दिली आहे. संघटनेच्या अकोला शाखेने सोमवारी या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांपासून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सादर केले.आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने तुटपुंजा मानधनावर कार्यरत असलेले ‘एनएचएम’ कर्मचारी आरोग्यसेवेत कायम करून घेण्याच्या मागणीसाठी गत अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. समान काम-समान वेतन व कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी हे कर्मचारी आंदोलन करीत आहेत. त्यांना सेवेत सामावून घेण्याची शक्यता पडताळण्यासाठी आरोग्य विभागाने अभ्यास समिती गठित केली असतानाच, आयुक्त, आरोग्यसेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या कार्यालयाकडून २ एप्रिल रोजी राज्यभरातील जिल्हा कार्यालयांना कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मूल्यांकन अहवालाची एक्सलशिट पाठविण्यात आली आहे. यामध्ये कामाच्या स्वरूपानुसार गुणांकन पद्धती असून, त्यावर आधारित मूल्यांकन अहवाल तयार होणार आहे. मूल्यांकन अहवालानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ, नोकरीवर कायम ठेवणे किंवा कमी करणे या बाबी निश्चित करण्यात येणार आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना यापुढे सहा महिन्यांची पुनर्नियुक्ती देण्याच्या सूचनाही अतिरिक्त संचालकांनी दिल्या आहेत. आरोग्य विभागाच्या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाने येत्या ११ एप्रिलपासून बेमुदत काम बंदचा इशारा दिला आहे. या अनुषंगाने बुधवार, ११ एप्रिल रोजी जिल्हा परिषद समोर सकाळी १०.३० ते ५.३० या वेळेत धरणे देत कामबंद आंदोलन करण्यात येईल, असे संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola cityअकोला शहर