शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नवविवाहितेवर पतीने केला प्राणघातक हल्ला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 12:38 IST

एक नवविवाहिता तिच्या एका मैत्रिणीसोबत दुचाकीवर जात असताना पाठीमागून आलेल्या तिच्या पतीने नवविवाहितेवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदर्श कॉलनी परिसरात एक नवविवाहिता तिच्या एका मैत्रिणीसोबत दुचाकीवर जात असताना पाठीमागून आलेल्या तिच्या पतीने नवविवाहितेवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. पतीने १० ते १२ वेळा तिच्या शरीरावर हल्ला केल्याने सदर नवविवाहिता गंभीर जखमी झाली असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.सिंधी कॅम्प येथील रहिवासी निशा इंगळे ही तिच्या मैत्रिणीसोबत आदर्श कॉलनीतून दुचाकीने जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या एकाने तिच्यावर चाकूने वार सुरू केले. तब्बल १० ते १२ वेळा हल्ला केल्यामुळे निशा जागेवरच गंभीर जखमी झाली. परिसरातील नागरिकांनी तातडीने खदान पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेला सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. निशा इंगळे हिचा काही महिन्यांआधी विवाह झाला होता; मात्र पतीसोबत वाद झाल्यानंतर ती काही दिवसांपासून आईकडे राहायला होती. याच वादातून तिचा पती आकाश मांडलेकर याने तिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची माहिती आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच खदान पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमीला उपचारासाठी दाखल केले. घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपीचा शोध सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी निशाचा पती आकाश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी