शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
4
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
5
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
6
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
7
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
8
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
9
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
10
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
11
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
12
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
13
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
14
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
15
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
16
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
17
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
18
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
19
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
20
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नवीन वर्षात जिल्ह्यातील ३९९ संपर्क केंद्रांत पोस्ट बँकेची घरपोच सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 13:21 IST

अकोला : अकोला जिल्ह्याने पोस्ट बँकेने पाच हजार खातेदार जोडण्याचा विक्रम केला असून, येत्या नवीन वर्षांपासून अकोला जिल्ह्यातील ३९९ संपर्क केंद्रात पोस्ट बँकेची घरपोच सेवा सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अकोला : अकोला जिल्ह्याने पोस्ट बँकेने पाच हजार खातेदार जोडण्याचा विक्रम केला असून, येत्या नवीन वर्षांपासून अकोला जिल्ह्यातील ३९९ संपर्क केंद्रात पोस्ट बँकेची घरपोच सेवा सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान पोस्ट बँक सेवा ३१ डिसेंबरच्या आत अपडेट करण्याचे निर्देश देशभरात दिले असून, त्याची तयारी प्रत्येक जिल्ह्यात केली जात आहे.१ सप्टेंबर २०१८ पासून देशभरात पोस्ट बँक सेवा अस्तित्वात आली. देशातील सर्वांत मोठी बँक म्हणून पोस्ट बँक समोर येईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला होता; मात्र क्यूआर कार्ड आणि मोबाइल अ‍ॅपमुळे पोस्ट बँकेच्या प्रगतीचा आलेख रेंगाळला. अकोला-वाशिम पोस्ट बँकेच्या अधिकाऱ्यांनी विविध महाविद्यालयांत जनजागृती शिबिर घेतले. सोबतच जिल्हा परिषद आणि जिल्हा आरोग्य अधिकाºयांच्या बैठका बोलावून आशाताई आणि जननी सुरक्षा योजनांसाठी पोस्ट बँक कशी महत्त्वाची आहे, हे सांगितले. अकोल्यातील विविध पोस्ट अधिकाºयांना बायोमेट्रिक मशीन देऊन खातेदार बनविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यामुळे अकोला जिल्हा पाच हजार खातेदारांचा आकडा पार करू शकला आहे. दरम्यान, देशभरातील पोस्ट बँका ३१ डिसेंबरपर्यंत अपडेट करण्याचे निर्देश दिले गेले असल्याने आता ही मोहीम अधिक गतिशील झाली आहे.घरपोच सेवेचा टोल फ्री क्रमांक १५५२९९डिसेंबरच्या आत देशभरातील सर्व पोस्ट बँका अपडेट होणार असून, नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच घरपोच सेवा सुरू होणार आहे. पोस्ट बँकेत उलाढाल करण्यासाठी खातेदार असलेल्या ग्राहकास या सेवेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी नाममात्र सेवा शुल्कही आकारले जाणार आहे. या सेवेसाठी क्यूआर कार्ड, पासवर्ड आणि मोबाइल अ‍ॅपवर येणारे ओटीपी यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर ग्राहकाची नोंद घेत ही सेवा थेट दिल्लीहून लोकेशन ट्रेसकरिता दिली जाणार आहे. आॅनलाइन कनेक्टिव्हिटीच्या समस्येत ही सेवा कितपत यशस्वी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाPost Officeपोस्ट ऑफिस