शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

शिवसेनेच्या महिला आघाडीसाठी नव्या चेहर्‍याचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 01:32 IST

अकोला :  जिल्ह्यात शिवसेनेची तटबंदी मजबूत करण्यासाठी  पश्‍चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख तथा खा. अरविंद सावंत व त्यांची  फळी जीवाचे रान करीत असल्याचे चित्र आहे. शिवसेना व इतर  राजकीय पक्षांच्या तुलनेत सेनेचे महिला संघटन खिळखिळे  झाल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देबैठकीकडे महिला कार्यकर्त्यांची पाठ; शिवसेना नेत्यांची तीव्र  नाराजी

आशिष गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  जिल्ह्यात शिवसेनेची तटबंदी मजबूत करण्यासाठी  पश्‍चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख तथा खा. अरविंद सावंत व त्यांची  फळी जीवाचे रान करीत असल्याचे चित्र आहे. शिवसेना व इतर  राजकीय पक्षांच्या तुलनेत सेनेचे महिला संघटन खिळखिळे  झाल्याचे चित्र आहे. महिला आघाडीच्या बैठकीत बोटावर मोज ता येणार्‍या महिला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीवर खा. अरविंद  सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत नवीन चेहर्‍याचा शोध  घेण्याचे निर्देश स्थानिक पदाधिकार्‍यांनी दिल्याची माहिती आहे. कधीकाळी जिल्ह्यातील बोरगाव मंजू, रिसोड, अकोट  विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व गाजविणार्‍या शिवसेनेची  पीछेहाट झाल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात शिवसेनेचा दरारा  निर्माण करणारे माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे व स्थानिक  पदाधिकार्‍यांमधील अंतर्गत वादावर पडदा न टाकता त्याला खत पाणी घालण्याचे काम तत्कालीन पश्‍चिम विदर्भ संपर्कप्रमुखांनी  इमानइतबारे बजावले. त्यामुळे शिवसेनेची मजबूत तटबंदी कधी  ढासळली, हे पक्ष नेतृत्वाच्या लक्षातही आले नाही. खा. अरविंद  सावंत यांच्याकडे पश्‍चिम विदर्भाच्या संपर्कप्रमुख पदाची धुरा येई पर्यंत बराच उशीर झाला होता. मागील १३ वर्षांच्या कालावधीत  सेनेच्या पदाधिकार्‍यांनी जि.प. सर्कल प्रमुख, पंचायत समिती  सर्कल प्रमुख, बुथ प्रमुख, शाखा प्रमुख, विभाग प्रमुखांच्या  माध्यमातून पक्षाची कितपत बांधणी केली, हा संशोधनाचा विषय  आहे. परिणामी पक्ष रसातळाला गेला. खा. अरविंद सावंत यांनी  पक्षाची धुरा सांभाळताच जिल्हा कार्यकारिणीत फेरबदल केले.  जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी नव्या दमाच्या शिवसैनिकांना  एकत्र करून पक्ष संघटना वाढीवर लक्ष केंद्रित केले आहे.  विविध आंदोलनांच्या माध्यमातून पक्षाने राजकीय धुराळा  उठविल्याचे चित्र आहे. साहजिकच, जिल्हा कार्यकारिणी पक्ष  वाढीसाठी मेहनत घेत असताना त्या तुलनेत सेनेची महिला  संघटना कमालीची खिळखिळी झाल्याचे चित्र दिसून येते.  बोटावर मोजता येणार्‍या महिला पदाधिकार्‍यांच्या पलीकडे सक्षम,  उत्साही महिलांचा फौजफाटा तयार नसल्याची परिस्थिती आहे.  हा प्रकार संपर्क प्रमुख खा. अरविंद सावंत यांच्या बैठकीत  उघडकीस आला. रविवारी (५ नोव्हेंबर) महिला आघाडीच्या बैठकीत उपस्थित  महिला कार्यकर्त्यांची संख्या पाहता खा. सावंत यांनी तीव्र शब्दात  नाराजी व्यक्त केली. तसेच आघाडीच्या बांधणीसाठी नव्या  चेहर्‍याचा शोध घेण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे. 

संघटनेची पुनर्बांधणी का नाही?स्वत: पक्षवाढीसाठी प्रयत्न करायचे नाहीत. त्यासाठी नवीन  कार्यकर्ता तयार होऊ द्यायचा नाही, असे धोरण स्वीकारणार्‍या  महिला पदाधिकार्‍यांनी आघाडीची पुनर्बांधणी का केली नाही,  असा सवाल उपस्थित होतो. आगामी जिल्हा परिषद, लोकसभा व विधानसभा  निवडणुकीसाठी पक्षाकडे महिला कार्यकर्त्या उपलब्ध नसल्याने  घरोघरी मतांचा जोगवा मागताना पक्षाला अडचणींचा सामना  करावा लागेल, असे दिसून येते.

नवीन चेहर्‍यांना प्राधान्य!महिला आघाडीची झालेली वाताहत पाहून शिवसेना नेते खा.  अरविंद सावंत प्रचंड नाराज आहेत. पक्षवाढीसाठी महिला  पदाधिकार्‍यांनी संधीचे सोने न केल्यामुळे नवीन चेहर्‍यांनाच  प्राधान्य देण्यावर पक्षात काथ्याकूट सुरु झाल्याची माहिती आहे.  यामुळे समाजकारणासाठी धडपडणार्‍या महिलांसाठी ही  सुवर्णसंधीच मानली जात आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाWomenमहिला