शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

हनुमान रथयात्रा बनणार अकोल्याची नवी सांस्कृतिक परंपरा

By admin | Updated: April 6, 2017 14:28 IST

हनुमान जयंतीनिमित्त अकोला शहरात जगन्नाथ पुरीच्या जगप्रसिद्ध रथयात्रेच्या धर्तीवर हनुमंताची विराट शोभायात्र काढण्यात येणार.

हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन : आयोजन समितीची जय्यत तयारीअकोला : येणार्‍या ११ एप्रिल रोजी हनुमान जयंतीनिमित्त अकोला शहरात जगन्नाथ पुरीच्या जगप्रसिद्ध रथयात्रेच्या धर्तीवर हनुमंताची विराट शोभायात्र काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजन समितीने पत्रकार परिषदेत दिली. राजराजेश्‍वर नगरी अशी ओळख असलेल्या अकोला शहरात सर्वच सण-उत्सव, धार्मिक सोहळे मोठय़ा उत्साहाने पार पाडले जातात. याच परपंरेत या वर्षापासून श्रीराम भक्त हनुमान जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्याचा भर पडणार आहे. या निमित्त शहरात एक भव्य व आगळी-वेगळी शोभायात्रा काढण्यात यावी, असा विचार घेऊन श्हरातील अनेक मान्यवर व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हनुमान जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्याचे ठरविले आहे. या संदर्भात जुने शहरातील काळा मारोती संस्थान, पंचमुखी हनुमान मंदीर, गोडबोल प्लॉट येथील हनुमान मंदिर, शास्त्री नगर, मोठी उमरी, देशमुख पेठ या परिसरात हनुमान भक्तांच्या बैठका होऊन शोभायात्रा काढण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मंगळवार, ११ एप्रिल रोजी दुपारी चार वाजता राजराजेश्‍वर मंदिर परिसरातून या शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. जयहिंद चौक, काळा मारोती, मोठा दगडी पुल, सिटी कोतवाली चौक, राममंदिर, जुने कापड बाजार, गांधी चौक अशी मार्गक्रमणा करीत ही शोभायात्रा सिटी कोतवाली चौकात येणार आहे. तेथे हनुमान मंदिरात महाआरती होऊन राममंदिर परिसरात शोभायात्रेचा समारोप होणार आहे. या शोभायात्रेत भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.पत्रकार परिषदेला काँग्रेस महानगरअध्यक्ष बबनराव चौधरी, कृष्णा अंधारे, अश्‍विन पांडे, अविनाश देशमुख, पवन पाडीया, कपील रावदेव, अरुंधती शिरसाट, पंकज साबळे, उषा विरक, रमाकांत खेतान, सुषमा निचळ, महेश गणगणे, बालमुकुंद भिरड, संतोष तीवारी, मामा अग्रवाल आदींची उपस्थिती होती.