शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसाची चिमुकली रस्त्यावर बेवारस आढळली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 11:06 IST

बेवारस चिमुकलीवर बालरुग्ण विभागात उपचार सुरू असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ‘मुलगी झाली, लक्ष्मी झाली’ असे नेहमीच म्हटल्या जाते. याच लक्ष्मीचे दिवाळीला पूजनही केले जाते; पण याच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी दोन दिवसीय चिमुकली रस्त्याच्या कडेला बेवारस आढळल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी दक्षतानगर पोलीस लाइन परिसरात घडला. ही चिमुकली कचऱ्यामधील एका पिशवीत असल्याचे येथील काही तरुणांच्या लक्षात येताच त्यांनी तिला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणाची माहिती त्यांनी पोलिसांना दिली असून, पोलीस तपास घेत आहेत.दक्षता नगरातील पोलीस लाइन परिसरात कचºयामध्ये सोमवारी सकाळपासूनच एक पिशवी संशयास्पद पडून होती. या पिशवीला काही कुत्रे ओढत असल्याचे नरेश राऊत नामक युवकाच्या निदर्शनास आले. नरेश राऊत हे येथून जवळच असलेल्या ख्रिश्चन कॉलनीतील रहिवासी असून, सकाळपासूनच त्या पिशवीकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष जात होते; पण त्याकडे सर्वजण दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी सांगितले. कुत्र्याने पिशवी ओढल्याने त्यामध्ये नवजात बाळ असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. या धक्कादायक प्रकारानंतर नरेश राऊत यांनी त्यांच्या मित्रांच्या सहाय्याने त्या बेवारस चिमुकलीला रुग्णसेवक आशिष सावळे यांच्या मदतीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. या धक्कादायक प्रकाराची माहिती त्यांनी खदान पोलिसांना दिली. माहिती मिळताच खदान पोलिसांनी सर्वोपचार रुग्णालय गाठले. यावेळी त्यांनी चौकशी करत नरेश राऊत यांनी सांगितल्यानुसार घटनास्थळाचा पंचनामा केला. दोन दिवसांच्या बेवारस चिमुकलीवर बालरुग्ण विभागात उपचार सुरू असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. चिमुकलीला वाचविण्यासाठी नरेश राऊत यांना विजय नावकार, दादु गवई, अनुप सुरवाडे, मोनु मानकर आणि प्रदीप ठाकूर यांनी सहकार्य केले. चिमुकलीला लागल्या होत्या मुंग्या कचºयामध्ये बेवारस पिशवीमध्ये आढळलेल्या दोन दिवसांच्या मुलीला त्या युवकांनी उचलले, त्यावेळी तिच्या अंगावर मुंग्या असल्याचे आढळून आले.  त्या युवकांनी मुलीच्या अंगावरील मुंग्या काढून मुलीला तत्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले.आॅक्टोबर महिन्यातील दुसरी घटना याच महिन्यात २ आॅक्टोबर रोजी सर्वोपचार रुग्णालयात एक बेवारस चिमुकली आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या मुलीला दोन महिलांनी बेवारस सोडल्याची घटना सीसी कॅमेºयात कैद झाली होती. या घटनेला महिना होत नाही, तोच आणखी एक चिमुकली रस्त्याच्या कडेला कचºयामध्ये आढळून आली.

टॅग्स :Akolaअकोला