अकोला: पोलिसांकडून सटोडियांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी आकोटसारख्या छोट्या शहरातून सट्टय़ाचे जाळे देशभरात विणले गेले असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. सट्टाह्यनरेशह्ण म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या येथील बुकीने स्वत:चा अत्याधुनिक अड्डाच तयार केला असून, हॉटलाइन आणि लॅपटॉपसह सर्वच सोयी येथे उपलब्ध असतात. २४ मोबाइल फोनच्या माध्यमातून कोलकातापासून ते मुंबईपर्यंंतच्या सटोडियांशी येथून संपर्क साधला जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सध्या टी-२0 विश्वकरंडक स्पर्धेचे सामने सुरू आहेत. यानिमित्त अकोला जिल्ह्यात क्रीडा स्पर्धांंंवर मोठय़ा प्रमाणात सट्टा लावण्यात येत असून, शहरात ह्यजय माता दीह्ण, ह्यबालाजीह्ण या टोपण नावाने बुकींच्या टोळ्याच सक्रिय झाल्या आहेत. बुकींच्या टोळ्या क्रिकेट, फुटबॉल, हॉकीसह इतरही सामन्यांवर सट्टा लावतात. या बुकींची उलाढाल कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. बुकींनी आपले जाळे देशभरात पसरविले असून, सटोडियांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.
‘सट्टा नरेश’चे देशभर जाळे!
By admin | Updated: March 21, 2016 02:06 IST