नेर : तेल्हारा तालुक्यातील नेर गाव विविध समस्यांच्या विळख्यात अडकले आहे. गावात अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.गावातील रस्त्यांची पार दुरवस्था झाली असून, या रस्त्यांवरून वाहने नेताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. गावकर्यांना शेतातून त्यांचा माल आणण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावात सांडपाण्याची नीट व्यवस्था नसल्यामुळे रस्त्यांवर गटाराचे साम्राज्य पसरले आहे. गावातील नाल्या तुंबल्या आहेत. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. गावकर्यांना पाण्याचा पुरवठा करणार्या जलवाहिन्या अनेक ठिकाणी फुटल्याचे दिसून येत आहे. नळाचे स्टँडपोस्टभोवतीही घाणीचे साम्राज्य पसरले आहे. घाण पाण्याचा विळखा असलेल्या या स्टँडपोस्टवरून लोकांना पाणी भरावे लागते. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)
नेर अडकले समस्यांच्या विळख्यात
By admin | Updated: May 3, 2014 19:07 IST