शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीत रब्बी पीक कर्ज वाटपाकडे दुर्लक्ष; अकोला जिल्हय़ात केवळ आठ कोटींचे कर्ज वाटप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 01:19 IST

अकोला : रब्बी हंगामासाठी यावर्षी जिल्हय़ात ६0 कोटी ४२ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना, त्या तुलनेत १८ जानेवारीपर्यंत केवळ ८ कोटी ३१ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे कर्जमाफीच्या धामधुमीत जिल्हय़ात रब्बी कर्ज वाटपाकडे कानाडोळा करण्यात आल्याची बाब समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रब्बी हंगामासाठी यावर्षी जिल्हय़ात ६0 कोटी ४२ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना, त्या तुलनेत १८ जानेवारीपर्यंत केवळ ८ कोटी ३१ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे कर्जमाफीच्या धामधुमीत जिल्हय़ात रब्बी कर्ज वाटपाकडे कानाडोळा करण्यात आल्याची बाब समोर आली आहे.यावर्षीच्या रब्बी हंगामात जिल्हय़ातील शेतकर्‍यांना ६0 कोटी ४२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत निश्‍चित करण्यात आले. जिल्हय़ात रब्बी पिकांच्या पेरण्या आटोपल्या असून, १८ जानेवारीपर्यंत उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ८ कोटी ३१ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ात कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे; मात्र कर्जमाफीच्या धामधुमीत रब्बी पीक कर्ज वाटपाकडे कानाडोळा करण्यात येत आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत वाटप करण्यात आलेले रब्बी पीक कर्ज वाटपाचे प्रमाण लक्षात घेता, जिल्हय़ात ५२ कोटी ११ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप अद्याप बाकी आहे. त्यामुळे यावर्षी जिल्हय़ातील रब्बी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बँकनिहाय असे करण्यात आले कर्ज वाटप!१८ जानेवारीपर्यंत जिल्हय़ात ८ कोटी ३१ लाख रुपयांचे रब्बी पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत ८ कोटी २८ हजार रुपये आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ३0 लाख ७२ हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.

रब्बी पीक कर्ज वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ६0 कोटी ४२ लाख रुपये रब्बी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून, त्यापैकी आतापर्यंत जिल्हय़ात ८ कोटी ३१ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.-जी.जी. मावळे,जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

टॅग्स :agricultureशेती