शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

हौशी रंगभूमीवर काम करण्यासाठी परिश्रम हवेत! -  ज्येष्ठ नाट्यकर्मी राम जाधव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 14:28 IST

अकोला: हौशी रंगभूमीकडे युवकांनी वळून दर्जेदार नाटके बसविली पाहिजे. मन आणि शरीराने अभिनय केल्यास तो परिपक्व अभिनय दिसतो, अशा शब्दात अ.भा. मराठी नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नाट्यकर्मी राम जाधव यांनी मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देअखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबईच्या नियामक मंडळावर ज्येष्ठ नाट्यकर्मी अशोक ढेरे, अनिल कुळकर्णी यांची बिनविरोध निवड.मुंबईच्या नियामक मंडळावर बिनविरोध निवडून आलेले अशोक ढेरे, अनिल कुळकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. मुंबईच्या नियामक मंडळाच्या निवडणुकीसाठी अकोला व मलकापूर शाखेने ढेरे व कुळकर्णी यांना उमेदवारी दिली होती.

अकोला: हौशी रंगभूमीपेक्षा युवा कलावंत व्यावसायिक रंगभूमीला महत्त्व देतात. हौशी रंगभूमीवर काम करताना अधिक मेहनत घ्यावी लागते आणि ही मेहनत करण्याची युवा कलावंतांची मानसिकता दिसत नाही. कसदार अभिनय करायचा असेल, तर हौशी रंगभूमीकडे युवकांनी वळून दर्जेदार नाटके बसविली पाहिजे. मन आणि शरीराने अभिनय केल्यास तो परिपक्व अभिनय दिसतो, अशा शब्दात अ.भा. मराठी नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नाट्यकर्मी राम जाधव यांनी मार्गदर्शन केले.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबईच्या नियामक मंडळावर ज्येष्ठ नाट्यकर्मी अशोक ढेरे, अनिल कुळकर्णी यांची बिनविरोध निवड झाल्यानिमित्त मंगळवारी सायंकाळी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राम जाधव बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रकाश जोशी होते. अतिथी म्हणून अ.भा. मराठी नाट्य परिषद मलकापूर (अकोला) शाखेचे अध्यक्ष प्रा. मधू जाधव, नाट्य लेखक बालचंद्र उखळकर, भारत सुरडकर उपस्थित होते. त्यावेळी राम जाधव व प्रकाश जोशी यांच्या हस्ते अ.भा. मराठी नाट्य परिषद, मुंबईच्या नियामक मंडळावर बिनविरोध निवडून आलेले अशोक ढेरे, अनिल कुळकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. अ.भा. मराठी नाट्य परिषद मुंबईच्या नियामक मंडळाच्या निवडणुकीसाठी अकोला व मलकापूर शाखेने ढेरे व कुळकर्णी यांना उमेदवारी दिली होती. त्यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी अ.भा. मराठी नाट्य परिषद अकोला शाखेचे अध्यक्ष माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर, कार्याध्यक्ष राम जाधव, उपाध्यक्ष रमाकांत खेतान, प्रमुख कार्यवाह शुभदा देव, शशिकांत जोशी, मुकुंद जोशी, रश्मी जोशी, प्रा. डॉ. ज्ञानसागर भोकरे, मलकापूर शाखेचे अध्यक्ष प्रा. मधू जाधव, डॉ. गजानन नारे, बालचंद्र उखळकर, अ‍ॅड. विनोद साकरकर आदींनी प्रयत्न केले. त्यावेळी प्रकाश जोशी यांनी दोन्ही पदाधिकाºयांची बिनविरोध झालेली निवड हे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे यश आहे, अशा शब्दात कौतुक केले. प्रा. मधू जाधव यांनी यंदा प्रथमच दोन्ही शाखा एकजूट झाल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. आता या दोन्ही शाखा सोबत काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत जामदार यांनी केले. आभार प्रा. डॉ. ज्ञानसागर भोकरे यांनी मानले. (प्रतिनिधी) 

 

टॅग्स :Akolaअकोला