शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाेलिसांची मदत हवी? आता डायल करा ११२; दहाव्या मिनिटाला पाेलीस मदत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:19 IST

अकोला : जिल्ह्यातील पोलिसांशी तत्काळ संपर्क साधण्यासाठी ‘१००’ हा हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. मात्र हा क्रमांक बदलून १६ ...

अकोला : जिल्ह्यातील पोलिसांशी तत्काळ संपर्क साधण्यासाठी ‘१००’ हा हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. मात्र हा क्रमांक बदलून १६ सप्टेंबरपासून ‘११२’ या एकाच हेल्पलाईनवरून सर्व प्रकारची मदत मिळत आहे. हा नंबर डायल केल्यानंतर अवघ्या दहाव्या मिनिटाला पोलीस घटनास्थळी हजर राहतील, असे नियोजन करण्यात आले असून, त्यासाठी ३१ इमर्जन्सी रिस्पाॅन्स व्हेईकल सज्ज करण्यात आलेली आहेत. या वाहनांवर माेबाईल डाटा टर्मिनल जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाईस यंत्रणा २४ तास कार्यरत राहणार आहे.

जिल्ह्यात एकूण २३ पोलीस ठाणी आहेत. त्यांत ११२ अधिकारी व २३२५ अंमलदार कार्यरत आहेत. दरम्यान, या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्काळ मदत हवी असल्यास त्यांना १६ सप्टेंबरपासून ११२ हा हेल्पलाईन क्रमांक डायल करावा लागणार आहे. विशिष्ट यंत्रणेच्या साहाय्याने एका ठिकाणी फोन लावल्यावर अवघ्या काही सेकंदात हा फोन कोठून आला, हे संबंधितांना कळणार आहे. त्यानंतर तेथील पोलीस नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल, महिला हेल्पलाईन, चाईल्ड हेल्पलाइन यांना एकाच वेळी त्या कॉलची माहिती दिली जाणार आहे. जेणेकरून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊ शकतील. आपत्कालीन प्रतिसाद साहाय्य प्रणाली (ईआरएसएस) निर्मितीचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाची अकाेला जिल्ह्यात १६ सप्टेंबर राेजी सुरुवात करण्यात आली आहे़ नागरिकही आता १०० ऐवजी ११२ या क्रमांकावर काॅल करीत आहेत़ तसेच तत्काळ मदतही मिळाल्याची माहिती आहे़

......................

काॅल येताच कळणार लोकेशन

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, कुठलीही घटना घडल्यास पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचावेत, यासाठी ११२ हा हेल्पलाईन क्रमांक १६ सप्टेंबर राेजी कार्यान्वित केला आहे. या क्रमांकावरून काॅल येताच विशेष यंत्रणेच्या मदतीने व वाहनांवरील जीपीएसच्या साहाय्याने काॅल नेमका कोठून आला, याचे लोकेशन कळविण्याची व्यवस्था उभी केली आहे. त्यामुळे पोलीस घटनास्थळी उशिरा पोहोचणे, आरोपी फरार होणे यांसह इतरही बाबींना आळा बसणार आहे.

....

३१ चारचाकी, ४८ दुचाकी वाहने

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अकोला पोलीस दलात नऊ चारचाकी वाहने दाखल झाली हाेती. त्यानंतर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी ३० चारचाकी वाहने व ४८ दुचाकी वाहने देण्याची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे केल्यानंतर आता ३१ चारचाकी व ४८ दुचाकी अद्ययावत वाहने मिळाली असून, पोलिसांना आपले कर्तव्य अधिक गतीने बजावण्यासाठी मदत होणार आहे.

....................

५५ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

राज्यातील इतर जिल्ह्यांसह अकोला जिल्ह्याचेही सध्या ‘जिओ टॅगिंग’ केले जात आहे. त्याचबरोबर ‘सेंट्रलाईज कंट्रोल रूम’ला फोन आल्यावर कशा प्रकारे प्रतिसाद द्यायचा, स्थानिक कंट्रोल रूमला फोन आल्यावर काय प्रक्रिया राबवायची याबाबत प्रशिक्षण प्रणाली निश्चित करण्यात आली आहे. त्याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. अकोला जिल्हा पोलीस दलातील दोन अधिकारी १८ वायरलेसचे कर्मचारी व इतर विभागाचे २० पोलीस कर्मचारी अशा प्रकारे एकूण ५५ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

......................

गेल्या काही वर्षांत पोलीस दल अधिक ‘हायटेक’ करण्याचे प्रयत्न शासन स्तरावरून सातत्याने केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कुठेही घटना घडल्यास त्या ठिकाणी पोलीस तत्काळ पोहोचावेत, यासाठी ११२ हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित करण्याची प्रक्रिया गतीने करण्यात आली. अकाेल्यात हा प्रकल्प १६ सप्टेंबरपासून कार्यान्वित करण्यात आला आहे.

- जी. श्रीधर

जिल्हा पोलीस अधीक्षक, अकोला

............