शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पाेलिसांची मदत हवी? आता डायल करा ११२; दहाव्या मिनिटाला पाेलीस मदत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:21 IST

अकोला : जिल्ह्यातील पोलिसांशी तात्काळ संपर्क साधण्यासाठी ‘१००’ हा हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. मात्र हा क्रमांक बदलून १६ ...

अकोला : जिल्ह्यातील पोलिसांशी तात्काळ संपर्क साधण्यासाठी ‘१००’ हा हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. मात्र हा क्रमांक बदलून १६ सप्टेंबरपासून ‘११२’ या एकाच हेल्पलाईनवरून सर्व प्रकारची मदत मिळत आहे. हा नंबर डायल केल्यानंतर अवघ्या दहाव्या मिनिटाला पोलीस घटनास्थळी हजर राहतील, असे नियोजन करण्यात आले असून, त्यासाठी ३१ इमर्जन्सी रिस्पाॅन्स व्हेईकल सज्ज करण्यात आलेल्या आहेत. या वाहनांवर माेबाईल डाटा टर्मिनल जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाईस यंत्रणा २४ तास कार्यरत राहणार आहे.

जिल्ह्यात एकूण २३ पोलीस ठाणी आहेत. त्यात ११२ अधिकारी व २३२५ अंमलदार कार्यरत आहेत. दरम्यान, या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ मदत हवी असल्यास त्यांना १६ सप्टेंबरपासून ११२ हा हेल्पलाईन क्रमांक डायल करावा लागणार आहे. विशिष्ट यंत्रणेच्या साहाय्याने एका ठिकाणी फोन लावल्यावर अवघ्या काही सेकंदात हा फोन कोठून आला, हे संबंधितांना कळणार आहे. त्यानंतर तेथील पोलीस नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल, महिला हेल्पलाईन, चाईल्ड हेल्पलाइन यांना एकाचवेळी त्या कॉलची माहिती दिली जाणार आहे. जेणेकरून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊ शकतील. आपत्कालीन प्रतिसाद साहाय्य प्रणाली (ईआरएसएस) निर्मितीचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाची अकाेला जिल्ह्यात १६ सप्टेंबर राेजी सुरुवात करण्यात आली आहे़ नागरिकही आता १०० ऐवजी ११२ या क्रमांकावर काॅल करीत आहेत़ तसेच तात्काळ मदतही मिळाल्याची माहिती आहे़

......................

काॅल येताच कळणार लोकेशन

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, कुठलीही घटना घडल्यास पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचावेत, यासाठी ११२ हा हेल्पलाईन क्रमांक १६ सप्टेंबर राेजी कार्यान्वित केला आहे. या क्रमांकावरून काॅल येताच विशेष यंत्रणेच्या मदतीने व वाहनांवरील जीपीएसच्या साहाय्याने काॅल नेमका कोठून आला, याचे लोकेशन कळविण्याची व्यवस्था उभी केली आहे. त्यामुळे पोलीस घटनास्थळी उशिरा पोहोचणे, आरोपी फरार होणे यासह इतरही बाबींना आळा बसणार आहे.

....

३१ चारचाकी, ४८ दुचाकी वाहने

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अकोला पोलीस दलात नऊ चारचाकी वाहने दाखल झाली हाेती. त्यानंतर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी ३० चारचाकी वाहने व ४८ दुचाकी वाहने देण्याची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे केल्यानंतर आता ३१ चारचाकी व ४८ दुचाकी अद्ययावत वाहने मिळाली असून, पोलिसांना आपले कर्तव्य अधिक गतीने बजावण्यासाठी मदत होणार आहे.

....................

५५ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

राज्यातील इतर जिल्ह्यांसह अकोला जिल्ह्याचेही सध्या ‘जिओ टॅगिंग’ केले जात आहे. त्याचबरोबर ‘सेंट्रलाईज कंट्रोल रूम’ला फोन आल्यावर कशा प्रकारे प्रतिसाद द्यायचा, स्थानिक कंट्रोल रूमला फोन आल्यावर काय प्रक्रिया राबवायची याबाबत प्रशिक्षण प्रणाली निश्चित करण्यात आली आहे. त्याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. अकोला जिल्हा पोलीस दलातील दोन अधिकारी १८ वायरलेसचे कर्मचारी व इतर विभागाचे २० पोलीस कर्मचारी अशा प्रकारे एकूण ५५ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

......................

गेल्या काही वर्षांत पोलीस दल अधिक ‘हायटेक’ करण्याचे प्रयत्न शासन स्तरावरून सातत्याने केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कुठेही घटना घडल्यास त्याठिकाणी पोलीस तत्काळ पोहोचावेत, यासाठी ११२ हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित करण्याची प्रक्रिया गतीने करण्यात आली. अकाेल्यात हा प्रकल्प १६ सप्टेंबरपासून कार्यान्वित करण्यात आला आहे.

- जी. श्रीधर

जिल्हा पोलीस अधीक्षक, अकोला

............